Monday, 4 January 2016

ब्राह्मण समाजाचा 18वा उपवधू-उपवर परिचय मेळावा 10 जानेवारीला




                                     नांदेड (प्रतिनिधी) -  ब्राह्मण महासंघ नांदेड व श्री रेणुकाई वधू-वर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण समाजाचा 18वा राज्यस्तरीय मेळावा दि.10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
उपवर मुलींनी परिचय मेळाव्यामध्ये स्वतःचा परिचय करून दिल्यास त्यांची नोंदणी मोफत केली जाणार असल्याचे मेळाव्याचे संयोजक व ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड.महेश कनकदंडे यांनी दिली. नोंदणीकरिता श्री रेणुकाई वधू-वर सूचक व सल्ला केंद्र, मिल युनिट, विजयनगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नियोजित मेळावा दि.10 जानेवारी रोजी विजयनगर येथील हनुमान मंदिर मंगल कार्यालयात होणार आहे.
मेळावापूर्व तयारीसंदर्भात झालेल्या बैठकीला रत्नाकर वाघमारे, प्रांताध्यक्ष दिपक भोरे, ऍड.रमेश परळकर, डॉ.गजानन चौधरी, डॉ.रवींद्र बिलोलीकर, डॉ.मुकुंद जोशी, डॉ.शिरीष अर्धापूरकर, डॉ.मुकुंद कुलकर्णी, मनोज देशपांडे, डॉ.दि. भा. जोशी, डॉ.उमेश भालेराव, विजय जोशी, रवींद्र कुलकर्णी, कृष्णा उमरीकर, गोपाळ देशपांडे, विक्रम राजे, बलभीम रेणापूरकर, संजय जवळेकर, शैलेंद्र डोईफोडे, ऍड.अनुप पांडे, ऍड.गणेश भाले, ऍड.राजेश कुलकर्णी, कुमार कुलकर्णी, गिरीश कहाळेकर आदींची उपस्थिती होती.

No comments: