Monday, 4 January 2016

नमस्कार लाईव्ह ०४-०१-२०१६ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०४-०१-२०१६ चे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर पुन्हा हल्ला 

                           उत्तर अफगाणिस्तानातील भारताच्या वाणिज्य दूतावासावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. गोळीबाराच्या आवाजाने मजार- ए -शरीफ शहर पुन्हा हादरलं आहे. काल रात्रीच इथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी दोन अतिरेक्यांना ठार करण्यात आलं होतं. मात्र आज अतिरेक्यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे. भारतात पंजाबजवळच्या पठाणकोटमध्ये अद्याप दहशतवाद्यांशी चकमक सुरुच आहे. त्यावेळी तिकडे अफगाणिस्तानातही भारतीय दूतावासाला लक्ष्य केलं जात आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचा दौरा केला. त्यावेळ भारताकडे परतताना त्यांनी पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. या भेटीनंतर अतिरेक्यांनी दहशवादी कारवाईला सुरुवात केली आहे. पठाणकोटमध्ये शनिवारी पहाटे हल्ला केला. अतिरेक्यांसोबतची चकमक अद्याप सुरूच असताना, दहशवाद्यांनी अफगाणिस्तानातही भारतीय दूतावासाला लक्ष्य केलं.

२- अफगाणिस्तान - काबूल विमानतळाजवळ एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवून लावल्याचे वृत्त 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- भाजपाचा सबनीसांना विरोध हे झुंडशाहीचे श्रीखंडी स्वरूप का? - उद्धव ठाकरे 

                           पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करून त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ' पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांच्या कार्यक्रमाला शिवेसेनेने केलेला विरोध हा भाजपाला झुंडशाही वाटली होती, मग सबनीसांच्या तंगड्या तोडण्याची भाषा करत भाजपा कार्यकर्त्यांनी केलेला विरोध हा म्हणजे झुंडशाहीचे श्रीखंडी स्वरूप आहे का?' असा सवाल उद्धव यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून विचारला आहे. तसेच गुलाम अली व कसुरीप्रमाणे मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष सबनीस यांच्या च्या तंगड्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यावर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. या लेखातून त्यांनी सबनीसांवरही टीकास्त्र सोडले आहे.

४- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल पंतप्रधान मोदींच्या भेटीला  

                         पठाणकोट आणि अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ येथील भारतीय दूतावासाजवळील हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत रॉ आणि आईबीचेही अधिकारी असतील. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा सबळ पुरावे भारताकडे आहेत. त्यामुळे या बैठकीत काय घडामोडी होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे पठाणकोट हल्ल्यासंदर्भात हवाई दलाची पत्रकार परिषदही होणार आहे. अद्याप पठाणकोटमधली धुमश्चक्री थांबली नसल्याचं वृत्त आहे. एकीकडे पठाणकोटमध्ये दहशतवाद्यांशी झुंज सुरु असताना दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा भारतीय दूतावासाजवळ दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला आहे. काल तेथील दोन दहशतवाद्यांन कंठस्नान घालण्यात आलं होतं. मात्र, अजूनही दोन दहशतवादी असल्याची शंका आहे. त्यामुळे प्रत्यक्ष त्याठिकाणी काय परिस्थिती आहे. हे या पत्रकार परिषदेनंतर कळू शकणार आहे.

५- आकाशवाणीने इतिहास रचला, आजच्या बातम्या अंध निवेदकाने दिल्या 

                        बातम्यांच्या जगतात आज इतिहास घडला आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्राने हा इतिहास घडवला आहे. पुणे केंद्रावरील सकाळी सात दहाचं बातमीपत्र चक्क एका दृष्टीहीन निवेदकाने वाचलं. धनराज पाटील या निवेदकाने ब्रेल लिपीच्या सहाय्याने आजच्या बातम्या दिल्या. ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त आजच्या बातम्या अंध व्यक्तीनं सादर कराव्या, असं नियोजन आकाशवाणीने केलं होतं. श्राव्य माध्यम असलेल्या आकाशवाणीशी अंध व्यक्तींचं तसं जिव्हाळ्याचं नातं. त्यामुळेच आकाशवाणीने थेट अंध निवेदकाकडून आजच्या बातम्या वाचण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने सकाळी सात दहाच्या बातम्या धनराज पाटील यांनी दिल्या. आकाशवाणीवरील हा पहिलाच प्रयोग होता. त्यामुळे आकाशवाणीच्या इतिहासात धनराज पाटील यांचं नाव पहिला अंध वृत्तनिवेदक म्हणून नोंदवलं गेलं आहे.

६- ईशान्य आणि पूर्व भारताच भूकंपाचे तीव्र धक्के, ६ ठार, १०० जखमी 

                       मणिपूर: भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी आज पहाटे  ईशान्य भारत हादरला. मणिपूरमध्ये पहाटे साडेचारच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपात मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता 6.7 रिश्टर असल्याची माहिती मिळते आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी तात्काळ गृहमंत्र्यांशी संपर्क साधत भूकंपाची माहिती घेतली. तसंच त्यांनी आसामचे मुख्यमंत्री गोगोई यांच्याशीही फोनवरुन परिस्थितीचा आढावा घेतला.

७- एका रात्रीत हा शेतकरी झाला अब्जाधीश 

                     असं म्हणतात देव ज्याला देतो त्याला छप्पर फाडून देतो. असंच काहीस पलासनेरमध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्यासोबत झालंय जो एका रात्रीत अब्जाधीश बनला. ही गोष्ट त्यालाही माहीत नव्हती. आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर त्याला ही गोष्ट समजली. या नोटिशीत या शेतकऱ्यांच्या खात्यात इतकी मोठी रक्कम कोठून आली याचे स्पष्टीकरण मागितले होते. मिळालेल्या माहितीनुसार, घाशीराम शिवलाल असं या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पासबुकमधील एंट्रीमध्ये ६९२ दशअब्ज ९१ अब्ज ६ कोटी ९४ लाख ४१ हजार ६२९ इतकी रक्कम दिस होती. ही एंट्री तीन आणि ८ तारखेला करण्यात आलीये. दरम्यान, ही काही मोठी बाब नसल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. टेक्निकल एररमुळे हे घडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयकर विभागाने याबाबत माहिती मागितल्यास बँक देईल असेही त्यांनी सांगितले.

~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- मुंबईत हायअलर्ट, महत्वाच्या ठिकाणांवर बंदोबस्तात वाढ 

                          पठाणकोटमधल्या अतिरेकी हल्ल्यानं देशातल्या महत्त्वाच्या शहरांना अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुंबईतल्या संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी कमालीचा बंदोबस्त वाढवला आहे. मुंबईतल्या गजबजलेल्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहेत. मुंबईत गेटवेचा परिसर, वेस्टर्न एक्प्रसेस हायवे, मरीन ड्राईव्ह अशा महत्वाच्या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला साधारण ५५ तास उलटले आहेत. मात्र, अद्यापही याठिकाणची चकमक थांबलेली नाही. कारण, ४ दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर आणखी २ दहशतवादी याठिकाणी दबा धरुन असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे सरकारनं ऑपरेशन संपल्याची घोषणा करण्याच्या नादात घाई केली. काल गृहमंत्रालयानं तातडीची पत्रकार परिषद घेत अजूनही ऑपरेशन सुरु असल्याची माहिती दिली. शिवाय या हल्ल्याचा अलर्ट आधीच दिला असल्याचाही दावा केला.

९- नागपुरात भाजप आमदाराकडून कायदा हातात, बारची तोडफोड 

                             नागपूरच्या रामटेकमधील बिअरबारची तोडफोड केल्याप्रकरणी मल्लिकार्जुन रेड्डी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रविवारी कार्यकर्त्यांसोबत एका रिसॉर्टची तोडफोड केली. अयोध्येत राम मंदिर उभारलं जावं, यासाठी बजरंग दलाच्या वतीने एक बाईक रॅली काढण्यात आली होती. रॅलीनंतर बजरंग दल आणि भाजपचे कार्यकर्ते रामटेक गड मंदिराजवळ पोहोचले आणि राजकमल रिसॉर्ट आणि बिअर बारची त्यांनी तोडफोड सुरु केली. मंदिर परिसराजवळ हे बिअर बार नको, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रिसॉर्टमधील कुंड्या, खुर्च्या, दारु आणि बाटल्यांसह मांसाहारी पदार्थही बाहेर फेकण्यात आले. विशेष म्हणजे तोडफोड झालेले राजकमल बार राज्य सरकारच्या MTDC (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ) च्या मालकीच्या असलेल्या जागेवर भाडेतत्वावर खाजगी व्यक्तीला चालवायला दिलं आहे. त्यामुळे एका बाजूला महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या वतीने भाडे तत्वावर जागा दिली जाते आणि त्याच ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार तोडफोड करतात असं काहीसं विरोधाभासी चित्र आज रामटेक मध्ये पहायला मिळालं.

१०- नागपूर जिल्ह्यात आढळले वाघ आणि बिबट्यांचे मृतदेह 

                            नागपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजलीय. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील देवलापार इथं एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळला आहे. अंदाजे ५ ते ६ वर्ष वयाचा हा वाघ आहे. वाघाच्या शरीरावर कुठल्याच प्रकारच्या जखमा नसल्यानं त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास वनविभाग करत असून वाघाच्या शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. तर एका बिबट्याचा मृतदेह चिमनाझरी इथंल्या रेल्वे लाईनच्या शेजारी मिळाला असून बिबट्याच्या अंगावरदेखील कुठल्याच प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही प्राण्यांचा मृत्यू हा नैसर्गिक की अजून काही कारणामुळे झालाय याचा

११- मुंबई; इंदौरहून आणले १६ वर्षीय मुलीसाठी हृदय 

                              मध्यप्रदेशातील इंदौरहून हृदय मुंबईतील एका मुलीच्या मदतीला धावून आले आहे. या वेळेस मुंबईतील हृदयरोगतज्ज्ञ इंदौर येथे जाऊन त्यांनी हे हृदय अवघ्या १ तास ५७ मिनिटांत ५४६ किमीचा प्रवास करून मुंबईत आणले. ज्या मुलीवर त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले, ती शस्त्रक्रियादेखील यशस्वी झाली आहे.नववर्षाच्या सुरुवातीलाच विक्रोळी येथील १६ वर्षीय मुलीला या हृदयाची अमूल्य अशी भेट मिळाली आहे. इंदौर येथील एमजीएम रुग्णालयात २० वर्षे वयाच्या तरुणीवर उपचार सुरु होते.तिच्या डोक्याला जबर मार बसला होता. रविवार, ३ जानेवारी रोजी सकाळी या तरुणीला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थेने मिळून तिच्या पालकांशी संवाद साधला.त्या वेळेस तिच्या पालकांनी तिचे हृदय आणि यकृत दान करण्यास संमती दर्शवली. तत्काळ इंदौरच्या आरोग्य विभागाशी चर्चा करण्यात आली. तातडीने सर्व परवानग्या मिळाल्या आणि पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली. ब्रेन डेड झालेल्या २० वर्षीय तरुणीचे हृदय मुंबईत आणण्यात आले, तर यकृत दिल्लीत नेण्यात आले. ‘१८ वर्षांखालील मुलांवर शस्त्रक्रिया करताना ही गुंतागुंत असते. त्यासाठी आम्ही एक विशिष्ट प्रक्रिया वापरतो. दात्याचे हृदय काही वेळ ‘रेस्ट’साठी ठेवले जाते. त्यानंतर त्या हृदयाचे प्रत्यारोपण केले जाते. त्यामुळे स्नायूंशी जुळवून घेणे, नव्या हृदयाला सोपे जाते,’ असे फोर्टिस रुग्णालयाचे पिडिएट्रिक्स कार्डिओलॉजी विभाग प्रमुख डॉ. विजय अग्रवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रत्यारोपणामुळे जनजागृती नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हृदय प्रत्यारोपण यशस्वी झाले ही आनंदाची बाब आहे. या प्रत्यारापेणामुळे जनजागृती होईल आणि अनेक जण पुढे येतील, अशी आशा आहे. अवयवाची गरज असलेल्या गरजूंची संख्या वाढत आहे, पण अवयवदानाचा टक्का वाढल्याने ही दरी कमी होईल. इंदौरच्या अधिकाऱ्यांकडूनही आम्हाला खूप सहकार्य मिळाले. - डॉ.सुजाता पटवर्धन, सरचिटणीस, मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती आकाशातही ग्रीन कॉरिडोर यशस्वी एअरपोर्ट आणि ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन इंदौर ते मुंबई अवकाश मार्गावर ग्रीन कॉरिडोर यशस्वी केला. मुंबईत एअरपोर्टच्या गेट क्रमांक आठपासून ते फोर्टिस रुग्णालयात या मार्गावर ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता.

१२- विमानात संशयास्पद मोबाईल सापडल्याने तुर्की एअरलाईन्सच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- शहिदांच्या कुटुंबीयांचे दाते 7 महिन्यांपासून मुलाच्या शोधात 

                           नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावणारं नागपुरातील चौरसिया दाम्पत्य आज एकटं पडल्याचं दिसतंय. सेना, पोलीस, समाज यांच्या दुःखात नेहमी सहभागी झालेल्या चौरसियांचा मुलगा हरवला आहे आणि त्याला शोधण्यासाठी चौरसियांना गावागावातून पोस्टर लावत फिरण्याची वेळ आलीय. रिझर्व्ह बँकेत काम केलेले जयप्रकाश हे संवेदनशील व्यक्तिमत्त्व. ओव्हरटाईमचा पैसा ते पंतप्रधान मदत निधीला द्यायचे. शहीद हेमराजचं शीर जेव्हा पाकिस्तान्यांनी उडवलं. तेव्हा चौरसिया हेमराजच्या कुटुंबाला दरमहा 5 हजार रुपये पाठवायचे. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दरवर्षी पोलिसांच्या फंडाला साडे बारा हजारांची मदत ते पाठवायचे. त्याच संवेदनशील दाम्पत्यावर दुःखाचा कडा कोसळला आहे. 7 महिन्यापूर्वी त्यांचा मुलगा अखिल घरातून बाहेर पडला, मात्र तो आजवर परतलेला नाही. कधी पतंगावर पोराचा फोटो चिकटवून ते पोरांमध्ये वाटतात, तर कधी नागपुरातल्या भिंतीवर पोस्टर लावतात. गेल्या 7 महिन्यांपासून सुरु असलेला शोध संपता संपत नाही. कधी घरचा फोन खणखणतो… कुठे तरी अखिलला पाहिल्याचं कळतं… शोध सुरु होतो… आणि हाती येते निराशा… 7 महिन्यांपासून आशा-निराशेचा खेळ सुरुच आहे.

१४- शिक्षणासाठी 10 तासांची पायपीट, कोयनेच्या 16 गावातली व्यथा 

                            कोयनेसाठी विस्थापितांच्या यादीत असलेल्या, पण विस्थापित न झालेल्या 16 गावांकडे वनविभाग लक्ष देत नसल्याचा आरोप आहे. लोकांनी श्रमदानातून रस्ता तयार केला… पण त्याच्या डांबरीकरणाकडे वनखात्यानं दुर्लक्ष केलं.. गावकऱ्यांनी सायबांना चर्चेसाठी बोलावलं पण परतीचा मार्ग मात्र बंद केला. फॉरेस्टच्या सायबांनी विनवण्या करुन सुटका करुन घेतली खरी, पण गावकरी आजही आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम आहेत.

१५- मुंबई: धारावीतील नया नगर येथील घरात आग, ४ फायर इंजिन्स, ५ वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल 

                    माहिमच्या रहेजा रुग्णालयाशेजारीच ही आग लागलीय. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी रवाना झालेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न शर्थीने सुरु आहेत. दरम्यान, या अपघातात आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाल्याचे वृत्त नाहीये.गेल्याच महिन्यात कांदिवलीच्या दामूनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. यात दोन हजार झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.

१६- अहमदनगर; पारनेर तालुक्यात म्हस्केवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू 
 १७- ठाणे महापालिकेचे लिपीकांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- आयपीएल आणि बीसीसीआयसाठी स्वतंत्र नियामक स्थापन करण्याची लोढा समितीची शिफारस.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१९- हदगाव; नेवारी जि.प. शाळा डिजिटलच्या वाटेवर 
२०- - महात्मा बसवेश्वर पुतळ्यासाठी उद्या मनापासमोर शंखानाद व धरणे आंदोलन 
२१- शहरातील मुलींचा जन्मदर वाढला; गेल्या पाच वर्षातील उच्चांक 
२२- मनपासमोरील वादग्रस्त फलक झाला बेवारस; आयुक्त्र व महापालिकेचे नाव मिटविले 
२३- हदगावमध्ये युवक कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल 
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपल्याकडून चूक झाली तर कमीपणा वाटून घेवू नका, ती चूक भविष्यात होणार नाही याची काळजी घ्या....
चुका करणे हे 'मनुष्य' असण्याचे प्रतिक आहे...
[डी.पी. गायकवाड, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
विठ्ठल जाधव, तुकाराम पर्गे, निलेश मंत्री, मधु शर्मा, पंडित लोढे, बालाजी मामीडवार, सुरेश गरंधी, शिवहार भोपळे, संकेत सोनखेडकर, संदीप चौरिया, सत्येंद्र लाठकर, बबलू कदम, रोहित वाळूजकर, अजिंक्य मुळे, उषा पाटील, जगदीश म्हात्रे, मच्छिंद्र अरगडे, अनंत कदम, समीर गोस्वामी, बाळासाहेब मोरे, उत्कर्ष कदम
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आपल्या नवीन वर्षीच्या संकल्पांना आम्ही नमस्कार लाईव्हमधून प्रसिद्धी देवू.
पाठवा आपले संकल्प आम्हाला - 8975495656
आमच्या वाचकाचा संकल्प
"मी दररोज रोजनिशी लिहील"- रुपेश दरक, वसमत
*****************
नमस्कार लाईव्हमध्ये डिसेंबर महिन्यात २७५ नवीन ग्रुप अॅड झालेत
सर्व नवीन ग्रुपचे हार्दिक स्वागत.
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: