नमस्कार लाईव्ह ०५-०१-२०१६ चे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- श्रीलंकेच्या नौदलाने आज पहाटे तामिळनाडूच्या १२ मच्छिमारांना घेतले ताब्यात
२- अफगणिस्तानमधील भारतीय दूतावासावर हल्ला करणाऱ्या तिनही दहशतवाद्यांना कंठस्नान.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- पठाणकोट हल्ल्याला तोडीस तोड उत्तर केव्हा? सामनाचा सवाल
पठाणकोटच्या हल्ल्याचे पडसाद ‘सामना’च्या अग्रलेखातही उमटल्याचं पाहायला मिळत आहे. ‘आजही बंदुका आणि तोफांच्या आवाजांनी देशाच्या कानठळ्या बसल्या आहेत आणि तरीही आपण पठाणकोट हल्ल्याचा बदला घेणार नसू तर राजपथावर शस्त्रांचं प्रदर्शन दाखवण्यात अर्थ नाही’ अशा शब्दांत मोदी सरकारवर शिवसेनेने टीकास्त्र सोडलं आहे. शरीफ यांच्यासोबत चहापान घेणारे आमचे पंतप्रधान शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाना काय उत्तर देणार आहेत? असा थेट सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
४- केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारला पठाणकोट हल्ल्यांसदर्भात अहवाल सादर करण्याचा दिला आदेश
५- पठाणकोट हल्ल्यात वीरमरण आलेल्या लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांना बंगळुरुत अखेरचा निरोप
पठाणकोट हल्ल्यात वीरमरण आलेल्या लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांना बंगळुरुत अखेरचा निरोप देण्यात आला. मात्र, यावेळी निरंजन कुमार यांच्या पत्नी आणि दोन वर्षाच्या चिमुकलीची अवस्था बघताना प्रत्येकाचेच डोळे पाणावले.निरंजन कुमार आपल्यातून निघून गेले, पण तुमच्या-आमच्या मनात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेऊन गेल्याची भावना कुटुंबानं व्यक्त केली आहे.34 वर्षांच्या उमद्या जवानाला आज देशानं गमावलं. पठाणकोटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या अतिरेक्यांना तोंड देताना निरंजन देशाच्या कामी आला. धारातीर्थी पडण्याआधीच वडिलांनी आपल्या लेकराला फोन केला होता. पण पठाणकोटला निघण्याच्या घाईत असलेल्या पोराशी मनभरून बोलताही आलं नाही.
६- सहकारी बँकांना दिवाळखोरीत घालणार्या संचालकांवर निवडणूक लढण्यास 10 वर्षांची बंदी
भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून ज्या बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे, त्या संचालकांना पुढील दोन टप्प्यांत म्हणजेच तब्बल 10 वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी या प्रस्तावावर शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे.राज्य सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयामुळे दोन्ही काँग्रेसमधील सहकार सम्राटांना मोठा दणका बसणार आहे.अनियमित कामकाजामुळे बँक अडचणीत येण्यास कारणीभूत ठरलेल्या संचालकांना पुन्हा बँकेची निवडणूक लढवायला मज्जाव करावा, असा आग्रह रिझर्व्ह बँकेने केला होता. त्याचाच आधार घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सहकारावरील हुकूमत मोडीत काढण्याच्या हालचाली भाजप-शिवसेना युती सरकारने सुरू केल्या आहेत. आज होणार्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिखर बँकांना दिवाळखोरीत घालणार्या संचालकांचं आज भवितव्य ठरणार आहे.
७- संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर पठाणकोटच्या दौऱ्यावर जाणार असून नौदल व वायुदल प्रमुखांची घेणार भेट
८- भारतीय रेल्वे शिवाजी महाराजांना विसरली
भारतीय रेल्वे शिवाजी महाराजांना विसरली की काय असा प्रश्न निर्माण होणारं उदाहरण समोर आलं आहे. २०१६ या कॅलेंडरमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीची सुट्टी द्यायलाच रेल्वेचा मुंबई विभाग विसरला आहे. वर्षातल्या 12 दिवसांच्या सुट्यांच्या यादीत दरवर्षी १९ फेब्रुवारीला मिळणारी शिवजयंतीची सुटी यावर्षी देण्यात आलेली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
९- पाटीदार पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याच्याविरोधात ८ जानेवारीपूर्वी आरोपपत्र दाखल करा - सुप्रीम कोर्टाचे गुजरात पोलिसांना आदेश
१०- नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आपच्या नेत्याविरुद्ध अरुण जेटली यांनी केलेल्या मानहानीच्या दाव्याची आज न्यायालयात
होणार सुनावणी.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल
सोलापुरात सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेवरुन सुरु झालेला वादंग वाढण्याची चिन्हं आहेत. कारण काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्रणिती शिंदेंसह महापौर सुशीला आबोटे, मंदीर समिती अध्यक्ष धर्मराज काढादी यांच्यासह 31 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सदर बाजार पोलीस चौकीत पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला. आपत्कालीन रस्त्यावर मंडपाचा खांब रोवण्यासाठी गेल्याने आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह महपौर सुशिला आबुटे यांच्यासह ३१ जणांवर दाखल झाला गुन्हा. जमावबंदी आदेशासह विनापरवाना स्पीकर वापरणे, उपोषणाला बसणे या कारणास्तव कलम १३५, १३७ आणि १८८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
१२- झुंज अपयशी, अपघातातील जखमी कॉन्स्टेबल नितीन परबांचा मृत्यू
मुंबईत सायनमध्ये दोन दिवसांपूर्वी भरधाव मोटारसायकलच्या धडकेनं गंभीर जखमी झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल नितीन परब यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वडाळ्याच्या चार रस्ता रोडवर एका मोटरसायकल स्वारानं नाकाबंदीदरम्यान परब यांनी जोरदार धडक दिली होती.अपघातानंतर त्यांना तातडीनं सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल रात्री नितीन परब यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली.अत्यंत बेभान होऊन वेगवान बाईक चालवत एका बाईकस्वारानं पोलीस कॉन्स्टेबलला जोरदार धडक दिली होती. पोलीस कॉन्स्टेबल नितीन परबनं या बाईकस्वाराला थांबण्याचा इशारा केला होता. मात्र, गाडी न थांबवता सरळ पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर चढवली होती.
१३- खासदार चंद्रकांत खैरेंचा निजामी थाट, मुलीच्या लग्नात कोट्यवधींची उधळपट्टी
औरंगाबादमधील शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा निजामी थाट बघायला मिळाला आहे. औरंगाबादमध्ये आज चंद्रकांत खैरेंची मुलगी प्रेरणा खैरे यांचा विवाह सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे.प्रेरणा खैरे यांचा विवाह कर्नाटकातील धारवाडच्या बसवराज आरळकट्टी यांच्याशी झाला आहे. बसवराज यांचं बीईपर्यंत शिक्षण झालं आहे. टीसीएस या कंपनीचे ते सहाय्यक सल्लागार आहेत. मात्र, खैरेंनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे.काही वर्षांपूर्वी भास्कर जाधव यांच्या मुलाच्या लग्नात अशीच डोळे दिपवणारी उधळपट्टी झाली होती. विशेष म्हणजे जाधवांच्या लग्नात ज्या नम्रता केटरर्सनं व्यवस्था केली होती. त्यांचीच व्यवस्था खैरेंच्या मुलीच्या लग्नात होती.काल संगीत रजनीच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे, रामदास कदम, सुभाष देसाईंनी हजेरी लावली. आजच्या विवाह सोहळ्यालाही दिग्गजांची उपस्थिती होती.
१४- राम मंदिर बनविण्यासाठी मुस्लिम आणि ईसाई रस्त्यावर उतरतील - इंद्रेश कुमार, RSS
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- नक्षलींनी अपहृत केलेले साताऱ्याचे 'ते' तिघे गडचिरोलीत
नक्षलवाद्यांकडून नाट्यमयरित्या अपहरण झालेल्या सातारा जिल्ह्यातल्या तिन्ही मुलांना आज गडचिरोलीत आणलं गेलं आहे. छत्तीसगडमध्ये या विद्यार्थ्यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं होतं. पुण्यात शिकणाऱ्या आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे या विद्यार्थ्यांनी भारत जोडो अभियानाच्या सायकल रॅलीत सहभाग घेतला होता. पुणे ते ओडिशाच्या मलकानगिरीपर्यंत ही सायरल रॅली जाणार होती. मात्र छत्तीसगडमध्ये या विद्यार्थ्यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं. हे तिघेजण विद्यार्थी असल्याची खात्री पटल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांना मुक्त केलं. आज या तिन्ही मुलांना गडचिरोलीला आणलं गेलं आहे. वैद्यकीय चाचणीत तिन्ही तरुण मेडिकली फीट असल्याची माहिती आहे.
१६- दादरच्या उड्डाणपुलावरुन खाली पडून दुचाकीस्वार सुखरुप
सोमवारी रात्री मुंबईत झालेल्या एका विचित्र अपघातातून दुचाकीस्वार आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. कारच्या धडकेनंतर उड्डाणपुलावरुन खाली पडलेले अन्वर शेख अपघातात जखमी झाले आहेत. दादर टीटी फ्लायओव्हरवरुन जात असताना अन्वर शेख यांच्या अॅक्टिवाला इंडिका कारने जोरदार धडक दिली. या धडकेत अन्वर शेख उड्डाणपुलावरुन थेट खाली पडले. योगायोगाने ते फ्लायओव्हरखालून जाणाऱ्या बसच्या टपावर पडले. यात शेख यांना जबर मार बसला असून अनेक ठिकाणी फ्रॅक्चरही झालं आहे. धडक मारणारा कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. अॅक्टिवाचालक अन्वर शेख यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
१७- राजकोट: महिलेचे अपहरण; चालत्या कारमध्ये बलात्कार; महिलेची पोलिसात तक्रार; एका व्यक्तीला अटक
१८- भूकंपानंतर मणिपूरमधील शाळा आठवडाभर बंद राहणार
१९- घाटकोपर स्थानकात फास्ट अपमार्गावरील पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- कल्याणच्या प्रणवचा भीमपराक्रम, एकट्याच्या नाबाद 900 धावा
२१- पोलिसांकडून गैरवर्तणूक 'बालिका वधू'फेम प्रत्युषा बॅनर्जीचा आरोप
पोलिसांच्या वेशात आलेल्या चार जणांनी आपल्याशी छेडछाड केल्याचा आरोप टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने केला आहे. कांदिवलीतील निवासस्थानी येत चौघांनी गैरवर्तन केल्याची तक्रार प्रत्युषाने पोलिसांत केली आहे.प्रत्युषा बॅनर्जी ‘बालिका वधू’ या मालिकेत आनंदी ही मुख्य भूमिका साकारते. त्याशिवाय तिने झलक दिखला जा, बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली होती.पोलिसांच्या वेशात आलेल्या चौघांनी कांदिवलीतील लालजीपाडामधल्या आपल्या घरी घुसण्याचा प्रयत्न करत गैरवर्तन केल्याचं तिने म्हटलं आहे. आरडाओरड करत आपल्या घरात घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला असं तिने तक्रारीत नमूद केलं आहे.पोलिसांनी मात्र प्रत्युषाचे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रत्युषासोबत राहणाऱ्या राहुल सिंग नावाच्या एका इसमाला शोधण्यासाठी साध्या वेशातील पोलिस तिच्या घरी गेले होते. मात्र त्यांनी अभिनेत्रीशी कुठल्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
चुका म्हणजेच शिक्षण आणि शिक्षण म्हणजेच जुन्या चुका परत होऊ न देणे.
[शिल्पा देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
रवी नरवाडे, वायूकुमार नायटे, नारायण पुप्पेकर, राजेश फुलारे, राज गायकवाड, मालधन पाटील, धनराज कदम, रवी राठोड, धोंडीबा माने, अय्युब पठाण, नर्सिंग कोळी, विलासराव पाटील, इब्राहीम मुजावर, प्रकास मोरे, शिरीष गीते, पंडितराव शिंदे, अशोक लोकडे, शशिकांत दामोदर, रवी हरकारे,
श्री पाटील
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आपल्या नवीन वर्षीच्या संकल्पांना आम्ही नमस्कार लाईव्हमधून प्रसिद्धी देवू.
पाठवा आपले संकल्प आम्हाला - 8975495656
आमच्या वाचकाचा संकल्प
१- "मी दररोज रोजनिशी लिहील"- रुपेश दरक, वसमत
2- मी शारिरिक दूष्टया तंदुरूस्त राहन्यासाठी नियमित सुर्यनमस्कार व प्राणायाम करीन - गणेश कवडेवार, लातूर 9404464862
*****************
नमस्कार लाईव्हमध्ये डिसेंबर महिन्यात २७५ नवीन ग्रुप अॅड झालेत
सर्व नवीन ग्रुपचे हार्दिक स्वागत.
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५ ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment