नमस्कार लाईव्ह ०३-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- लॉस एंजलिस; वॉशिग मशिनच्या वापरावरून झालेल्या वादात गेला चार जणांचा बळी
वॉशिंग मशिनच्या वापरावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान चार जणांच्या हत्येत झाल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. मुलाच्या मैत्रिणीबरोबर त्याच्या वडिलांचा वॉशिंग मशिन वापरण्यावर वाद झाला. मद्यपी असलेल्या व वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकांचा साठा असलेल्या वडिलांनी एक बंदूक घेतली गोळीबार केला ज्यात त्याच्या पत्नीसह तीन जण ठार झाले. मुलाने प्रसंगावधान साधत बंदुक घेतली व वडिलांना गोळ्या घातल्या ज्यात तेही ठार झाले. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. मुलगा मोरी याला पोलीसांनी अटक केली असून त्याला एक दशलक्ष डॉलर्स रकमेचा जामीन मिळाला आहे. मोरी व त्याची मैत्रिण आईवडिलांसोबत राहत होते. मोरीच्या आईला ह्रदयविकाराचा झटका आला असल्यामुळे तिची ते काळजी घेत होते. या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलेल्या अन्य दोघांनीही हकनाक जीव गमावला आहे.
२- सौदी अरेबिया; ४७ दहशतवाद्यांचा केला शिरच्छेद
दहशतवादाचा गुन्हा सिद्ध झालेल्या तब्बल ४७ जणांचा शनिवारी सौदी अरेबियामध्ये शिरच्छेद करण्यात आला आहे. यामध्ये एका प्रमुख शिया धर्मगुरूचाही समावेश आहे. २०११ मध्ये सोदी अरेबियामध्ये राजवटीमध्ये जी जोरदार निदर्शने करण्यात आली, त्यांची मुख्य प्रेरणा निम्र अल निम्र हा शिया धर्मगुरू होता. सुन्नी मुस्लीमांचं प्राबल्य असलेल्या प्रांतात शिया मुस्लीमांवर अन्याय होत असल्याचा दावा त्यांचा होता. या धर्मगुरूंचाही शिरच्छेद करण्यात आला आहे.अत्यंत कट्टर असा तकफिरी आदर्शवाद अंगीकारणे, दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणे आणि गुन्हेगारी कट रचणे असे आरोप सिद्ध झालेल्या ४७ जणांचा शिरच्छेद करण्यात आल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. २००३ व २००४ मध्ये दहशतवादी हल्ले केलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांचाही आज शिरच्छेद केलेल्यांमध्ये समावेश आहे. या सगळ्यांमध्ये एक ईजिप्तचा, एक छादचा तर उर्वरीत सगळे सौदी अरेबियाचे नागरिक होते.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- बॉम्बच्या धमकीमुळे दिल्ली रेल्वे स्थानकावर ‘हायअलर्ट’
मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाला ई-मेलवरुन दिल्ली-कानपूर मार्गावरील ट्रेन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे उत्तर भारतातील रेल्वे स्थानकांवर आज सकाळी एकच खळबळ उडाली. बाँबस्फोटाद्वारे दहशतवादी हल्ला घडवण्याच्या धमकीच्या पाश्र्वभूमीवर दिल्ली रेल्वे स्थानकाच्या सुरक्षाव्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे. मुंबई एटीएसने तात्काळ रेल्वे बोर्डाला याची माहिती दिली. त्यानंतर दिल्ली-लखनऊ शताब्दी एक्स्प्रेस गाझियाबाद इथे थांबवण्यात आली. सर्व प्रवाशांना ट्रेनमधून उतरवून ट्रेनची तपासणी करण्यात आली. मात्र ट्रेनमध्ये कुठेही बॉम्ब सापडला नाही. त्यानंतर ट्रेनला मार्गस्थ करण्यात आली.
४- पठाणकोटमध्ये बॉम्ब निकामी करताना लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद
पंजाबच्या पठाणकोटमध्ये आयईडी स्फोटकाचा बॉम्ब निकामी करत असताना लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद झाले आहेत. त्यासोबतच काल दहशतवाद्यांशी लढताना 3 जवान जखमी झाले होते. त्यांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. पठाणकोट हल्ल्यात आतापर्यंत एकूण 7 जवानांना वीरमरण आलं आहे. काल झालेल्या हल्ल्यानंतर अजूनही शोध मोहीम सुरु आहे. आणखी दोन अतिरेकी एअरफोर्स स्टेशनमध्ये असण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळते आहे.दरम्यान अजूनही पठाणकोट एअऱफोर्स स्टेशनमध्ये दोन दहशतवादी दबा धरून बसले असल्याची माहिती डीआयजींनी दिली आहे. एअरफोर्स स्टेशनमध्ये आजही आईडीचे 2 स्फोट झाले आहेत. त्यात तीन जवान जखमी आहेत. एनएसजी आणि पोलीसांचं पथक एअरफोर्स स्टेशनच्या आत सर्च ऑपरेशन करतं आहे. काल पाच दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं होतं.
५- बँकातील क्लार्कच्या पदांसाठी मुलाखत नाही
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील लिपिक तसेच त्याखालील पदांच्या नियुक्तीसाठी आता मुलाखत घेतली जाणार नाही. त्यामुळे लेखी परीक्षेचे नियम अधिक कठोर करण्याचे आदेश अर्थ मंत्रालयाने दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खालच्या पदांवरील भर्तीसांठी मुलाखत नको असे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. याबाबत वित्त विभागाने सार्वजनिक क्षेत्रातील सर्व २७ बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवलेय.
६- दिल्लीत गाडयांसाठीचा सम-विषम नियम मोडल्याप्रकरणी आतापर्यंत ५६७ जणांवर आकारला दंड
७- योगा फक्त आता भारताचीच नव्हे, जागतिक संपत्ती - पंतप्रधान मोदी
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- मारुंजीमध्ये लाखो स्वयंसेवकांना सरसंघाचकांचं मार्गदर्शन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वयंसेवकांना एकत्रित करण्यासाठी आज पिंपरीमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तब्बल 400 एकर जागेवर शिवशक्ती संगमाच्या कार्यक्रमासाठी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी भव्य देखावा उभारला आहे. या नऊमजली देखाव्यावरून सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. कार्यक्रमाच्या परिसरात प्लास्टिकचा वापर टाळण्यात आला आहे. शिवशक्ती संगम कार्यक्रमानंतर स्वयंसेवकांच्या परतीच्या प्रवासात त्यांच्या भोजनाचा प्रश्न चुटकीसरशी मिटवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मॅनेजमेंटचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. यासाठी शिदोरी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. याअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील एक लाख घरांमधून ही शिदोरी मागण्यात आली आहे. यामध्ये 10 तिखट-मिठाच्या पुऱ्या, शेंगदाण्याची चटणी आणि 2 तिळाचे लाडू देण्याची विनंती संघाकडून करण्यात आली आहे. आज कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित स्वयंसेवकांना ही शिदोरी वितरीत करण्यात येणार आहे.
९- परकीय शत्रूंशी लढण्यासाठी एकत्र आलेला समाज म्हणजे हिंदू समाज - मोहन भागवत, सरसंघचालक
१०- राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शिवशक्ती संगम कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, राम शिंदे उपस्थित, पश्चिम महाराष्ट्रात आरएसएसचे शक्तीप्रदर्शन.
११- पुण्यातील तिन्ही विद्यार्थ्यांची नक्षलवाद्यांकडून सुखरुप सुटका
नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या पुण्यातील तिन्ही विद्यार्थ्यांची नक्षलवाद्यांकडून सुखरुप सुटका केली आहे. तिघेही सध्या चिंतलनार पोलीस ठाण्यात असल्याचीही माहिती बस्तर पोलिसांनी दिली आहे. भारत जोडो अभियानातील सायकल रॅलीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या पुण्यातील तीन तरुणांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं होतं. हे विद्यार्थी पुणे ते ओडिशा व्हाया छत्तीसगड दरम्यानच्या सायकल रॅलीत सहभागी झाले होते. विकास वाळके, आदर्श पाटील आणि श्रीकृष्णा शेवाळे अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत.
१२- राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’तील अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ या चित्रपटात ‘पांडा’ ही भूमिका साकारलेल्या 34 वर्षीय अभिनेत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
प्रशांत इंगळे यांनी पांडा ही भूमिका साकारली होती. कर्जबाजारीपणा आणि सावकारी फासाला कंटाळून प्रशांत इंगळे यांनी किटकनाशक करणारे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे सुदैवाने ते बचावलेत.पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात इंगळे राहतात. प्रशांत इंगळे यांनी घर बांधण्यासाठी एका खासगी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. मात्र, यंदा कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. याचाच फटका प्रशांत आणि त्याच्या कुटुंबाला देखील बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्जामुळे ते दबावाखाली होते. त्यांच्यावर तीन लाखांचे कर्ज आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससूनमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर चार दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती इंगळे यांच्या नातेवाईकांनी दिली.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- गुजरातमध्ये समुद्रात उडी मारलेल्या सिंहाला वाचवण्यात यश
१४- अहमदनगरमध्ये एकाच क्रमांकाच्या दोन आलिशान कार जप्त
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१५- सावित्राबाई यांनी महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून - सौ. वर्षाताई भोसीकर
http://goo.gl/1nmWJz
~~~~~~~~~~~~~~~
१६- राजकोट; बुडत असलेल्या सिंहाला वनविभागाने तब्बल चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर वाचवलं
http://goo.gl/Zfm4bb
~~~~~~~~~~~~~~~
१७- 'एअरलिफ्ट'च्या नव्या ट्रेलरला एका दिवसात लाखो हिट्स
http://goo.gl/rhhrxn
~~~~~~~~~~~~~~~
१८- पुणे; २८वी महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धा, महिला पोलिस खेळाडू रेणूका देवणे यांना सुवर्ण पदक
http://goo.gl/cuY97V
~~~~~~~~~~~~~~~
१९- दि. ४ जानेवारी रोजी पोलीस मुख्यालय नांदेड येथे शास्त्र प्रदर्शन
http://goo.gl/BEvVh6
~~~~~~~~~~~~~~~
२०- शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीत असलेल्या श्री सहयोग कॅटरर्स व डेकोरेटर्सच्या गोदामाला आग लागून प्रचंड नुकसान
http://goo.gl/ZRy8GY
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
जो सूर्य आपल्याला उन्हाळ्यात माकोसा वाटतो, तोच हिवाळ्यात हवा-हवासा वाटतो....
माणूस देखील सुखामध्ये जवळच्या नात्यांना विसरतो, पण तीच नाती दु:खात आठवतात
[जयराम बनसोडे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नमस्कार लाईव्हमध्ये डिसेंबर महिन्यात २७५ नवीन ग्रुप अड्ड झालेत
सर्व नवीन ग्रुपचे हार्दिक स्वागत.
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५ ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment