Sunday, 3 January 2016

१६- सावित्राबाई यांनी महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून - सौ. वर्षाताई भोसीकर


कंधार वार्ताहर 
कतरे व्हि के पांगरेकर

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना समाजात मानाचे,आदराचे स्थान प्राप्त करुण दिले असे प्रतिपादन जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसिकर यांनी कंधार येथील प्रियदर्शनी प्राथमिक कन्या शाळा येथील आयोजित क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात त्यांना आभिवादन करतांना केले.कार्यक्रमच्या प्रारंभी क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा कांग्रेस कमिटीचेसरचिटणीस संजय भोसिकर,पानभोसिच्या सरपंच सौ.सुवर्णा नाईकवाडे,हणमंतराव पेठकर,पत्रकारदिगंबर गायकवाड़,योगेंद्रसिंह ठाकुर,हाफिज घड़ीवाला,

 मयुर कांबळे,विठ्ल गंदलवाड,शाळेतील शिक्षिका सौ.देशपांडे,सौ.पाटिल,सौ.बडवणे,शिक्षक किशोर अंबेकर,अशोक कांबळे,सुधीर तपासे, रावळे, मलशेटे सर व शाळेतील विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.यावेळी जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसिकर म्हणाल्या की 1 जानेवारी 1948 रोजी पुण्यात ज्योतीरावांनी आणि सावित्रीबाईनी मुलींची पहिली शाळा काढली व त्या पहिल्या मुख्यद्यापिका झाल्या.मुलींच्या शिक्षणाची खरीखुरी सुरुवात त्यांनी करून त्या शाळेमध्ये समाजात स्त्रियांना सन्मानाचा दर्जा मिळावा म्हणून अनेक कार्य केले.त्या काळातील अनेक कनिष्ठ प्रथा परंपराना त्यांनीविरोध केला.स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून सावित्रीबाई फुलेंनी दगड,गोटे,शेणाचेगोळे आंगवर झेलत स्त्री शिक्षणाचा पाया रचला.अशा परिस्थिथीला तोंड देत सावित्रीबाई संघर्ष करत उभ्या राहिल्या व महिलांना या समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणुन त्यांनी आपले आयुष्य पनास लावले.परंतु आजही काही महिलांना सावित्रीबाईचा जन्म केव्हा झाला हेमाहित नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.असे जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसिकर म्हणाल्या. 
यावेळी शाळेतील गुणवत्ता प्राप्त मुलींचा सत्कार सौ.वर्षाताई भोसिकर यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किशोर अंबेकर यांनी केले तर आभार अनिल रावळे यांनी मानले.या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.




No comments: