Saturday, 2 January 2016

नमस्कार लाईव्ह ०२-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०२-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- लाहोर : पाकचा 'सरप्राईज' दौरा करणाऱ्या मोदींविरुद्ध कोर्टात याचिका दाखल 

                    लाहोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी केलेल्या पाकिस्तान दौऱ्यानंतर आता लाहोर कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलीय. मुनीर अहमद नावाच्या एका व्यक्तीनं मोदींच्या या दौऱ्याविरुद्ध याचिका दाखल केलीय. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय नरेंद्र मोदी आपल्या फौजफाट्यासह पाकिस्तानात घुसले होते, असा आरोप या याचिकेत करण्यात आलाय. लाहोर दरम्यानवेळी मोदींसोबत १२० लोकांचा ताफा होता. मुनीर यांच्या म्हणण्यानुसार, मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यानं पाकिस्तानचे सगळे कायदे धाब्यावर बसवत पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली, असा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणात पाकिस्तान सरकार, सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट, एअरपोर्ट सिक्युरिटी फोर्स यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय.

२- शिया धर्मगुरूंचा शिरच्छेद केल्याप्रकरणी सौदी अरेबियाला चांगलीच किंमत मोजावी लागेल. - इराणची धमकी
३- दुबई जळत होतं... आणि ते सेल्फी काढत होते 

                     दोन दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुबईच्या एका हॉटेलमध्ये लागलेली आग तुम्हीही पाहिली असेल... याच घटनेशी संबंधित एक जोडपं सध्या सोशल वेबसाईटवर टीकेचं धनी ठरतंय. दुबईतल्या एका ६३ मजल्यांच्या इमारतीनं घेतलेला पेट भयंकर होता. ही आग पाहून अनेकांना भीती वाटली असेल किंवा आपल्या नातेवाईकांची काळजी वाटली असेल.... पण, याच वेळी एक जोडपं मात्र या जळत्या इमारतीसमोर 'सेल्फी' काढण्यात गुंग होतं. या जोडप्याची असंवेदनशीलता आता सोशल वेबसाईटवर चर्चेचा विषय ठरलीय... नेटिझन्सनं त्यांना चांगलंच फैलावर घेतलंय.

४- धक्कादायक : मुलीवर बलात्कार प्रकरणी आईला जेल 

                      ओहियो : आपल्याच १२ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी आईला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ३७ वर्षीय जेनी हिने तिच्याच मुलीवर बलात्कार करण्यासाठी प्रियकराला मदत केल्याने हि शिक्षा सुनावली आहे. मुलीवर आतापर्यंत किती वेळा बलात्कार करण्यात आला हे स्पष्ट झालेलं नाही. पण २ आठवड्यांपासून मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आई आणि तिच्या प्रियकराला शिक्षा सुनावण्यात आली आहे. 'मुलीने हि गोष्ट जेव्हा नातेवाईकाला सांगितली तेव्हा हि गोष्ट उघडकीस आल्याचं' मुलीच्या वकिलांने म्हटलं आहे. जेनी ही आता २० वर्षानंतर पेरोलवर बाहेर येऊ शकते.

~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे: राजनाथ सिंह 

                            पंजाबमधील पठाणकोट हवाईतळावर दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. पठणकोट हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मिळाले आहेत, अशी माहितीही राजनाथ सिंह यांनी दिली. पठाणकोट हल्ल्याबाबत भारतीय यंत्रणांना माहिती होती आणि यामुळेच हा हल्ला मोडून काढण्यात, दहशतवाद्यंना कंठस्नान घालण्यात यश आल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. भारताच्या गुप्तचर यंत्रणांना या हल्ल्याबाबत माहिती होती. यावरुनच स्पष्ट होतं की, गुप्तचर यंत्रणा उत्तम काम करत आहे, असेही राजनाथ म्हणाले. याआधी माध्यमांशी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले होते की, पठाणकोट हल्ल्याचं जशास तसे उत्तर दिले जाईल. पाकिस्तानसह सर्व देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात भारत आहे. मात्र, अशाप्रकारचे दहशतवादी हल्ले होत असतील, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.

६- पठाणकोट हल्ला, पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान, तीन जवान शहीद, पहाटे 3 वाजल्यापासून चकमक 

                           पंजाबमधील पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या पाचही पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. चार दहशतवाद्यांना काही तासांतच लष्कराच्या जवानांनी ठार केले होते, परंतु एक दहशतवादी लपून बसला होता. अखेर १५ तासांची कारवाई संपुष्टात येताना पाचव्या व शेवटच्या दहशतवाद्याचाही खात्मा करण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. सुरक्षा दलाच्या शोधमोहिमेदरम्यान हवाई दलाच्या इमारतीजवळून स्फोटाचे दोन मोठे आवाज आले व नंतर दुपारपासून चकमक सुरू होती. जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले असून अन्य पाच जवान जखमी झाले आहेत. लष्कराच्या वेषात आलेल्या काही दहशतवाद्यांनी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास हवाई दलाच्या तळावर अंदाधुंद गोळीबार करत जोरदार हल्ला चढवला. हवाई दलाच्या  जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर अन्य एका जवानाचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू  झाला. सुमारे पाच तासांच्या चकमकीनंतर ही मोहिम संपुष्टात आली, मात्र त्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहिमेदरम्यान हवाई दलाच्या तळावरून पुन्हा गोळीबाराचे व  स्फोटांचे आवाज येऊ लागल्याने तेथे आणखी काही दहशतवादी लपल्याचे स्पष्ट झाले. या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचण्यात आला होता अशी आपली  विश्वसनीय माहिती असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तर आम्हाला शांतता हवी असली तरी जसास तसे प्रत्युत्तर मिळेल असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ  सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने या हल्ल्याचा निषेध केला असून भारताशी दहशतवाद निर्मूलनासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

७- पोलीस ठाणे हवे तर क्राईम रेट वाढवा, गृहराज्य मंत्र्यांचा अजब सल्ला 

                      अहमदनगर जिल्ह्यात पाच पोलीस ठाणे प्रलंबित आहेत. मात्र क्राईम रेट कमी असल्यास पोलीस ठाणे मंजूर करता येत नाही. त्यामुळं तुम्हाला काही कमी पडलं तर क्राईम रेट वाढवणे हाती घ्यावं लागेल, असा अजब सल्ला गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी दिलाय. गृहराज्य मंत्र्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलंय.राज्यात सध्या नगरसह अनेक येथील पोलीस ठाणे प्रलंबित आहेत. मात्र नवीन पोलीस ठाणे मंजूर करायचं असेल तर क्राइम रेट वाढवावा लागतो. त्यामुळं तुम्हाला काही कमी पडलं तर क्राइम रेट वाढवणे हाती घ्यावं लागेल, हे मला गृहराज्यमंत्री झाल्यानंतर समजल्याची मुक्ताफळं राम शिंदेंनी उधळली आहेत. अहमदनगरला पोलीस स्टेशन इमारतीच्या उद्घाटनवेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर यावेळी गृह विभागचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग आणि विशेष पोलीस महानिरीक्षक जयजीत सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

८- पठाणकोट हल्ला - मरायच्या आधी खाऊन घे, दहशतवाद्याला आईचा सल्ला 

                     भारतीय हवाई दलाच्या ठाण्यावर दहशतवादी हल्ला चढवण्यापूर्वी एका दहशतवाद्याने पाकिस्तानात आपल्या घरी फोन केला होता. शुक्रवार रात्रीपासून भारतीय सुरक्षा दलाचे अधिकारी पाकिस्तानात केले जाणारे व तिथून येणारे फोन कॉल तपासत होते. त्यावेळी पठाणकोटमध्ये हल्ला चढवलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने घरी फोन केल्याचे आढळल्याचे भारतीय सुरक्षा रक्षकांना आढळल्याचे वृत्त झी मीडियाने दिले आहे. या दहशतवाद्याने घरी फोन केल्यावर त्याच्या आईने मरण्यापूर्वी खाऊन घे असे सांगितल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी भारतीय लष्करी अधिका-याला पळवले, त्यांना वाटेत टाकून त्यांची गाडी पळवली. याच दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला केला. चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले तर तीन भारतीय जवान शहीद झाले. या संपूर्ण परीसराला लष्कराने वेढा गातला असून आणखी दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

९- अदनान सामीला VIP वागणूक, आमचं काय? पाकमधून २० वर्षांपूर्वी आलेल्या स्थलांतरीतांची व्यथा 
                       अदनान सामीला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं, परंतु पाकिस्तानातून आलेल्या शेकडो हिंदूंसह अहमदी पंथाच्या अनेक पाकिस्तानी नागरिकांना जवळपास २० ते २५ वर्षे भारतात येऊनही नागरिकत्व मिळालेले नाही. यामुळे अदनान सामीला VIP वागणूक मिळाल्याची व गरीबांना कुणी वाली नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जालंधर व पठाणकोटमध्ये पाकिस्तानातून अनेक वर्षांपूर्वी आलेले सुमारे ३०० हिंदू राहतात. त्यांचे नागरिकत्वाचे अर्ज सरकार दरबारी नुसतेच पडून आहेत आणि प्रक्रिया सुरू आहे खास सरकारी ठेवणीचे उत्तर त्यांना ऐकवले जाते. तर कादियान समजाच्या पाकिस्तानातल्या मुलींनी भारतात लग्न केली आहेत, त्यांना मुलंही आहेत, परंतु त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेले नाही.

~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- महेश मोतेवारांना डिस्चार्ज, उमरगा कोर्टात हजेरी लावणार 

                       चिटफंड घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या ‘समृदध जीवन’चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांना आज पुण्याच्या ससून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. घोटाळ्या प्रकरणी अटक होताच मोतेवार यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यामुळे पुण्याच्या ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. डिस्चार्ज मिळाल्यामुळे मोतेवारांना उदगीरच्या कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. तीन राज्यातल्या पोलिसांना महेश मोतेवारांचा ताबा हवा आहे. त्यामुळे उदगीर कोर्टात पोहचल्यानंतर पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. चिटफंड आणि गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप मोतेवारांवर आहे. त्यामुळे त्यांना उस्मानाबाद पोलिसांनी 20 डिसेंबरला ताब्यात घेतलं आहे. न्यायालयाने त्यांना 31 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र जुना आजार बळवल्याचं कारण दिल्याने, मोतेवारांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

११- दिघ्यातील धोकादायक नसलेल्या इमारती अधिकृत करण्याचे संकेत 

                     दिघा परिसरातील अनाधिकृत इमारती प्रकरणात अखेर सरकारने हस्तक्षेप केला आहे. ज्या इमारती धोकादायक नाही त्यांना चारपट दंड लाऊन नियमित करणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे. आयबीएन लोकमतने दिघ्यातील बेघर होणार्‍या कुंटुबांचा प्रश्न लावून धरला होता. ज्या इमारती धोकायदायक आहे, त्या पाडल्या जातील मात्र रहिवाशांचं पुर्नवसन केलं जाणार आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्र्यांनी सिडको आणि एमआयडीसीला सुचना दिल्यात. या संदर्भात विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनीही सरकारला हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले होते. दिघ्यातील 92 इमारतींवर महापालिकेनं हातोडा चालवलंय. या कारवाईच्या विरोधात दिघ्यातील रहिवाशांनी आंदोलन पुकारले आहे.

१२- शरीफ हे ‘शरीफ’ नाही, पाकला आता जशास तसे उत्तर द्या : शिवसेना 

                      पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेनेने मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे शरीफ नाहीत. पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करू नये. पाकिस्तानच्या कुरापती पाहता त्यांना जशास तसं उत्तर द्यायची गरज आहे अशी मागणी शिवसेनेनं केलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत शांततेसाठी चर्चा करताय. आणि दुसरीकडे पाकिस्तानकडून दहशतवादी पाठवले जात आहे. एकाच वेळेस दहशतवाद आणि चर्चा होऊ शकत नाही. ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे. काश्मिर आज अस्वस्थ आहे. तिथे खुलेआम आयसिसचे झेंडे फडकावले जात आहे. आज पंजाबवर हल्ला केलाय. काश्मिर आणि पंजाबही दोन राज्य जर दहशतवाद्यांच्या मुठीत जायला लागली तर देशाची सुरक्षितता धोक्यात आहे. पाकला त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. हे आमचं म्हणणं आहे. पण सरकारकडून केवळं वल्गना केली जात आहे असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- रत्नागिरी ; वाघाचं काळीज असणाऱ्यानं बिबट्याचा जीव वाचवला 

                        तब्बल तीन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या बिबट्याला 20 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरुप वाचवण्यात वन विभागाला यश आलं आहे. रत्नागिरीच्या भोके गावात उप-वनसंरक्षक सुरेश उपरे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत ही बचाव मोहीम पार पाडली. एका विहिरीत बिबट्या पडल्याची खबर गावात पोहोचली आणि या बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली. हा बिबट्या तीन दिवसांपूर्वीच या विहिरीत पडला होता. विहिरीवर बसवलेल्या पंपातून गेल्या दोन दिवसापासून गढूळ पाणी येत होते. त्यामुळे काल ग्रामस्थांनी याच शोध घेतला तेव्हा विहिरीत बिबट्या जीव वाचवण्यासाठी धडपडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विहिरीच्या पाण्याजवळ भिंतीत असलेल्या एका घबीत या बिबट्याने आसरा घेतला होता त्यामुळे त्याच्या केवळ शरीराचा मागचा भाग आणि शेपूटच दिसत होतं. अखेर वन विभागाने या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत एक पिंजरा सोडला. पण बिबट्या काही केल्या या पिंजऱ्यात येत नव्हता. बिबट्या पिंजऱ्यात यावा म्हणून हरप्रकारचे प्रयत्न करण्यात आले. बिबट्या पिंजऱ्यात यावा म्हणून कुत्र्याचे पिल्लू पिंजऱ्यात ठेवून पिंजरा खाली सोडण्यात आला. पण कोणत्याच प्रलोभनाला हा बिबट्या भुलला नाही. अखेर दुसऱ्या पिंजऱ्यात वन विभागाचे अधिकारी सुरेश उपरे यांना बसवून पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. जीव धोक्यात घालत या बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यात आले.

१५- बागलकोट ; बोअरवेलमधून पाणी नव्हे, आगीच्या ज्वाळा 

                        बागलकोटमध्ये शेतात काढण्यात आलेल्या बोअरवेलमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येताना दिसत आहेत. कर्नाटकातल्या बागलकोटमध्ये हा अजब प्रकार पहायला मिळतोय. भिमाप्पा गोलभावी यांच्या शेतात हा प्रकार घडला. काही दिवस भिमाप्पांच्या शेतातली कूपनलिका बंद होती. पण गेल्या काही दिवसात वाढलेल्या थंडीमुळे काही शेतकरी त्याशेजारीचं शेकोटी पेटवून बसले. यावेळी अचानक या कूपनलिकेतून आगीच्या ज्वाला यायला लागल्या. काहींनी आगीची तीव्रता तपासण्यासाठी त्यावर भात शिजवून पाहीला तर काहींनी मक्याचं कणीसही भाजलं. आगीच्या ज्वाला बाहेर पडत असल्याचे पाहून घाबरलेल्या शेतकऱ्यांनी पोलीसाना याची माहिती   दिली .  काही अतिउत्साही तरुणांनी बोअरवेलवर  ठेवून भात शिजविण्याचे प्रात्यक्षिकही करून पाहिले . पोलिसांनी सदर घटना जिल्हाधिकारी आणी भूगर्भखात्याला कळविल्यावर त्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केली सध्या भूगर्भ विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून ते या जागेची तपासणी करत आहेत. या घटनेमागचं खरं कारण बाहेर येईलचं, पण तोपर्यंत भिमाप्पांच्या शेतात मात्र चांगलीच गर्दी पहायला मिळत आहे.

१६- साताऱ्यातील जवान गणेश जाधव यांचं राजस्थानमध्ये अपघाती निधन 

१७- श्रीपाल सबनीस यांच्या कार्यक्रमाला लातुरात पोलिस संरक्षण, कार्यक्रमापूर्वी भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वात महागडा शिलेदार 

                   आयपीएलमधला सर्वात महागडा शिलेदार भारताचा वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी नाही, तर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली हा असल्याचं बीसीसीआयनेच स्पष्ट केलं आहे. अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दिलेल्या वचनाला बीसीसीआय जागली आहे. बीसीसीआयने आयपीएलमधल्या नामवंत भारतीय आणि परदेशी शिलेदारांचं मानधन आपल्या वेबसाईटवर जाहीर केलं आहे. त्यानुसार ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोर’ विराट कोहलीला 15 कोटी रुपये वेतन मोजत आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१९- मुखेड येथील बियर-बारला आग; अग्निशामक गाडी मध्ये बिगाड
http://goo.gl/h37P88
~~~~~~~~~~~~~~~
२०- सह्याद्री वाहिनिच्‍या साडेनऊच्‍या बातम्‍यात 4 जानेवारी रोजी मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे
http://goo.gl/OEry5U
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही.
[संदीप भुरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नमस्कार लाईव्हमध्ये डिसेंबर महिन्यात २७५ नवीन ग्रुप अड्ड झालेत
सर्व नवीन ग्रुपचे हार्दिक स्वागत.
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: