Saturday, 2 January 2016

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात वाघलगाव येथे, शेतकऱ्याच्या तरुण मुलीची आत्महत्या



परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात वाघलगाव येथे,शेतकर्याच्या तरुण मुलीची आत्महत्या 

   लग्नाच्या चिंता व पैशाची जमवा जमव न झाल्याने विष प्राशन केले 

[ रविंद्र देशमुख -परभणी वार्ताहर]
                                परभणी - सोनपेठ तालुक्यातील शेतकर्याच्या तरुण मुलीने लग्नाच्या चिंतेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली आहे . 
सोनपेठ तालुक्यातील वाघलगाव येथील शेतकरी माणिक शिंदे यांच्या शारदा माणिक शिंदे वय (२१) या तरुण मुलीने आठ दिवसापूर्वी लग्नाच्या चिंतेने विष प्राशन केले होते तिला परळी येथील खाजगी दवाखाण्यात दाखल करण्यात आले होते . आठ दिवसा पासुन तिची मृत्यु शी झुंज सुरु होती , नव वर्षाच्या पहिल्या दिवशी तिचा दुर्दैवी मृत्यु झाला . माणिक शिंदे हे अल्प भुधारक शेतकरी आहेत त्यांना वाघलगाव येथे साडे तीन एकर जमीन आहे गेल्या तीन वर्षा पासुन आलेल्या नैसर्गिक आपत्ती मुळे शिंदे यांना कुठलेही उत्पन्न झाले नव्हते . माणिक शिंदे यांना चार मुली असुन दोन मुलींचे लग्न झालेले आहे दोन मुली लग्नाच्या होत्या . गेल्या दिवसा पासुन माणिक शिंदे हे मुलींच्या लग्नाच्या विषयामुळे चिंता ग्रस्त होते रोज रात्री घरात होणाऱ्या लग्नाच्या विषयामुळे शारदा ही चिंताग्रस्त झाली होती . गेल्या तीन वर्षा पासुन सतत झालेली नापिकी या मुले शिंदे कुटुंबीय आर्थिक संकटात होते .शारदा शिंदे हि सोनपेठ येथील राजीव गांधी महाविद्यालयात संगणक शास्त्राच्या दुसर्या वर्गात शिकत होती  परिवाराला मदत करण्यासाठी शारदा ही सोनपेठ येथील व्हिजन इंग्लिश स्कुल या शाळेत पार्ट टाईम नोकरी करत होती . मार्च २०१३ मध्ये झालेली गारपीट त्या नंतर सातत्याने पडलेला दुष्काळ या पार्श्वभुमीवर मुलींचे लग्न करणे कठीण असल्याची चर्चा सातत्याने घरात होत असल्याने शारदा चिंताग्रस्त झाली होती . दुष्काळात वडील आपल्या लग्नाच्या चिंतेने नैराश्य ग्रस्त झाल्याने आपण स्वतः जीव देऊन वडिलांना या चिंतेतून सोडवावे या उद्देशाने शारदा हिने आठ दिवसापुर्वी २५ डिसेंबर वाघलगाव येथील आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले . तिला परळी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते . आठ दिवस उपचार घेतल्या नंतर नाव वर्षाच्या पहिल्या दिवशी दि १ जानेवारी रोजी तिचा दुर्दैवी मृत्यु झाला.

No comments: