Sunday, 3 January 2016

'एअरलिफ्ट'च्या नव्या ट्रेलरला एका दिवसात लाखो हिट्स




सुपरस्टार अक्षयकुमारच्या आगामी ‘एअरलिफ्ट’ सिनेमाचा दुसरा ट्रेलर लाँच झाला आहे. एका दिवसातच दहा लाख हिट्सचा टप्पा एअरलिफ्टच्या दुसऱ्या ट्रेलरने पार केला आहे. अॅक्शन आणि इमोशन यांचा अनोखा संगम असलेल्या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे.
 
1990-91 च्या सुमारास घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे. इराक-कुवेत युद्धांची झळ पोहचलेल्या कुवेतमधल्या भारतीयांवर ‘एअरलिफ्ट’ सिनेमाची कथा बेतली आहे. राजा कृष्णा मेनन चित्रपटाचे दिग्दर्शक असून अक्षयसोबत ‘लंचबॉक्स’ फेम अभिनेत्री निमरत कौर मुख्य भूमिकेत आहे.
 
‘एअरलिफ्ट’ चित्रपटात अक्षय हा रणजित कटियार या कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीय व्यावसायिकाच्या भूमिकेत आहे. इराक-कुवेत युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुवेतमधल्या 1 लाख 70 हजार भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या रणजित कटियारची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.
 
एअरलिफ्टचं पोस्टर यापूर्वी लाँच करण्यात आलं होतं. त्यावर ‘170000 शरणार्थी, 488 विमानं, 59 दिवस, एक माणूस’ अशी टॅगलाईन होती. पुढच्या वर्षी म्हणजे 22 जानेवारी 2016 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

No comments: