नमस्कार लाईव्ह ०६-०१-२०१६ चे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- बराक ओबामांना अश्रू अनावर
अमेरिकेतील वाढत्या हिंसाचारामुळे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना अश्रू अनावर झाले. अमेरिकेमधील कित्येक घरात परावाना असलेल्या बंदुका आहेत. तर अनेकजण विनापरवाना शस्त्र बाळगत आहेत. अमेरिकेतील लोकांकडे असणाऱ्या शस्त्रांच्या उपलब्धीमुळे ओबामा यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी रिपब्लिक पार्टीची जाहीर मदत मागितली आहे. दरम्यान राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी ओबामा यांनी देशाला पूर्णपणे सुरक्षित करण्याची व्यवस्था करु, असा विश्वास व्यक्त केला. अमेरिकेत मागील काही वर्षात झालेल्या गोळीबारामध्ये तब्बल 10,000 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे याविषयी ओबामांनी चिंता व्यक्त केली आहे.
२- भूतानचे पंतप्रधान बुधवारपासून ४ दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- दिल्ली; नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला नवी इमारत लाभणार
दिल्लीतील प्रख्यात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला (NSD) लवकरच नवी इमारत लाभणार आहे. त्यासाठी 180 कोटी रुपयांच्या बजेटला प्राथमिक मंजुरी मिळाल्याचंही कळतं.दिल्लीच्या ल्यूटन्स झोनचा भाग असलेल्या मंडी हाऊस स्टेशन परिसरात एनएसडी वसलेली आहे. या मंडी हाऊस सर्कलला दिल्लीचा सांस्कृतिक सर्कल अशी ओळख आहे. कारण नाट्यचळवळीशी संबंधित सगळ्या मोठ्या संस्था याच सर्कलला लागून वसलेल्या आहेत.सध्याच्या जागेवरच एनएसडीची ही नवीन इमारत उभी राहणार आहे. बांधकाम करताना सध्याच्या वास्तूचं हेरिटेज महत्त्व टिकून राहिल, त्यात कलात्मकता दिसेल अशा पद्धतीनेच ते करण्याचा मानस एनएसडीचे संचालक वामन केंद्रे यांनी बोलून दाखवला.
४- भोपाळः एअर इंडियाच्या विमानाचे लॅंडिंग करताना टायर फुटल्याने अपघात, मात्र विमानातील सर्व ९५ प्रवासी सुरक्षित.
५- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तान दौरा चुकीचा नसून पाकिस्तानसोबत चर्चा होण्याची गरजः राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने केले मोदींच्या दौ-याचे समर्थन.
६- भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू आज नांदेडमध्ये; नमस्कार लाईव्हच्या वेबसाईटच्या उद्घाटननिमित्त फ्लॉवर एन फ्लॉवर्सला भेट देणार तसेच GSTवर नांदेडच्या व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणार
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- - मुंबई; पेव्हर ब्लॉकला बाहेरचा रस्ता, मुंबई मनपाचा निर्णय
मुंबईतल्या रस्त्यांवर यापुढे पेव्हर ब्लॉक्स वापरले जाणार नाहीत. नव्या पद्धतीने रस्ते बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.मुंबईच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि उखडले जाणारे पेव्हर ब्लॉक यांवर उपाय म्हणून नव्या पद्धतीनं रस्ते बांधण्याचं मुंबई महापालिकेने ठरवलं आहे. रस्त्यांवर पेव्हर ब्लॉकचा वापर संपूर्णपणे थांबवण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.मुंबईच्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यावर संपूर्णपणे बंदी घालण्यात येईल. रस्त्यांची बांधणी अस्फाल्ट, सीसी वापरुन करण्यात येईल. त्यामुळे खड्ड्यांना वैतागलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
८- मुंबईतही सम-विषम गाड्यांचा प्रयोग करावा, सेनेची मागणी
राज्यातील पर्यावरण अबाधित राखण्यासाठी दिल्ली प्रमाणेच मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये (एमएमआरडीए) दिल्लीप्रमाणे सम-विषम वाहनांचा प्रयोग करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे. मात्र,टोलवाल्यांची यामुळे वसुली कमी होणार असल्याने त्यांचा विरोध होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास होत असल्याने लोकसंख्या वाढीबरोबर वाहनाची संख्याही वाढत आहे. दिल्ली सारखीच परिस्थिती मुंबईची बनली आहे. वाहतूक कोंडीमुळे दोन-अडीच तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे ध्वनी आणि वायूप्रदुषणाबरोबरच इंधनाचीही नासाडी होते. सध्या दिल्लीमध्ये सम-विषम वाहनांचा प्रयोग 15 दिवसांपुरता सुरू केला असून दोन दिवसांतच प्रदूषणाची पातळी निम्म्यावर आल्याची नोंद आहे. तेव्हा,राज्यात असा प्रयोग केला तर भविष्यात वाहन चालकांना शिस्त लागेल, प्रदूषण कमी होईल, अपघातांच्या प्रमाणात घट होईल आणि इच्छीतस्थळी वेळेवर पोहचता येईल असा दावा सरनाईक यांनी केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर एमएमआरडीए क्षेत्रामध्ये सम-विषम वाहनांचा प्रयोग राबवावा अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.या बाबत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते काय भूमिका घेतात या वरून भविष्यात सेनेत वाद निर्माण होऊ शकतो.
९- माओवाद्यांनी अपहरण केलेले तिन्ही तरुण गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन
माओवाद्यांनी अपहरण केलेल्या पुण्यातल्या 3 तरुणांना गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. पुण्यामधले हे तीन तरुण छत्तीसगडमधल्या सुखमा जिल्ह्यात शांतीचा संदेश घेऊन गेले होते. माओवाद्यांनी या तरुणांचं अपहरण करून 4 दिवसानंतर त्यांना सोडलं होतं. या तरुणांना गडचिरोली पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आलं.पोलिसांचं हे पथक त्यांना घेऊन गडचिरोलीला परतलंय. विकास वाळके, आदर्श पाटील आणि श्रीकृष्ण खेवले अशी या तरुणांची नावं आहेत. बस्तरमधल्या जनतेशी संवाद साधण्यासाठी हे विद्यार्थी सायकलवरून बस्तरला गेले होते. 29 डिसेंबरला सुकमा जिल्ह्यातून जगरगुंडा भागात अपहरण करण्यात आलं होतं. या मुलांची सुटका होईपर्यंत दक्षिण बस्तरमध्ये नक्षलविरोधी अभियान थांबवण्याचा महत्त्वाचा निर्णय बस्तर पोलिसांनी घेतला होता.
१०- मुनगंटीवार उद्धव ठाकरेंना वाघाचा पुतळा भेट देणार
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत वाघाचे दात मोजण्यावरुन भाजप आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध रंगलं होतं. मात्र आता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मैत्रीचं पाऊल टाकलं आहे. मुनगंटीवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चक्क वाघाचा पुतळा भेट म्हणून देणार आहेत.शिवसेनेचं प्रतिक म्हणून अनेक ठिकाणी वाघाचं चित्र वापरलं जातं. त्यात आता मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना वाघाचा पुतळाच भेट म्हणून देण्याचं ठरवलं आहे. साडेतीन फुटांची ही वाघाची प्रतिकृती सध्या मंत्रालयातील मुनगंटीवार यांच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहे. 8 जानेवारीनंतर हा पुतळा उद्धव ठाकरेंना दिला जाईल.
११- दिल्लीतील रोहिणी परिसरात चोरांचा पाठलाग करणाताना विशेष तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्याचा गोळी लागून झाला मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- अमरावती:दुसरी मुलगी झाल्याने जन्मदात्रीनेच मुलीला चुलीत जाळलं
घरात एक मुलगी असताना दुसरी मुलगी झाल्याने गौरखेडा कुंभी या गावातील महिलेने एक महिन्याच्या चिमुरडीला चुलीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईनेच पोटच्या मुलीला जाळून टाकल्याची खळबळजनक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. चिमुरडी रडत असताना रागाच्या भरात आई निकिता वाकोडे हिने निशाणीला घराच्या चुलीमध्ये टाकून जाळून टाकलं, यामध्ये एका महिन्याची चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. चुलीत जाळल्यानंतर या मुलीचं प्रेत कुंभीनजीकच्या विच्छन नदीपात्राजवळ एका बॉक्समध्ये फेकण्यात आलं. गावातील लोकांनी हे प्रेत पोलिसांच्या निदर्शनास आणू दिल्यानंतर शोधाशोध सुरु झाली. तूर्तास या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. गरीबीमुळे मुलीचा सांभाळ कसा करायचा, असा प्रश्न या महिलेला पडला होता. त्यामुळे या चिमुरडीची हत्या केल्याची कबुली तिने दिली.
१३- उस्मानाबाद; शेतकरी दाम्पत्याचा करुण अंत, पतीच्या आत्महत्येच्या धक्क्याने पत्नीचाही मृत्यू
उस्मानाबाद जिल्ह्यात मन पिळून टाकणारी घटना घडली आहे..सततची नापिकी आणि कर्ज बाजरीपणाला कंटाळून नवऱ्याने गळफास घेतला हे पाहून पत्नीनेही आपला जीव सोडला आहे. कळंब तालुक्यातील कनेहरवाडी गावात ही घटना घडली.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव बालाजी मिटकरी आहे. केवळ 3 एकर एवढी शेती असून ही शेती वडिलांच्या नावावर होती पण करता पुरुष म्हणून बालाजी ही शेती पाहत होता. पण. सततच्या नापिकीमुळे शेतात कसले ही उत्पादन निघाले नाही. त्यात बँकचे कर्ज या मुळे बालाजी सतत चिंताग्रस्त झाले होते. आज नवरा बायको शेतात गेले असता मी विहिरीवरून पाणी पिऊन येतो असे सांगून बालाजी निघून गेले आणि पलीकडील शेतात जाऊन गळफास घेतला. बराच वेळ झाला नवरा कसा आला नाही. हे पाहण्यास गेलेल्या बायकोने आपल्या नवऱ्याचे प्रेत फाशी घेतलेल्या अवस्थेत पाहून ती जागेवरच कोसळली. तिला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृतघोषित केलं. या शेतकरी दाम्पत्याच्या पश्चात 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. वडिलाबरोबर आईच्या जाणणे ही लेकरे अनाथ झाल्याने गावासह जिल्ह्यात सगळीकडेच हळहळ व्यक्त होत आहे.
१४- औरंगाबादेत 19 जणांनी बदलली आपली ओळख, लिंगबदलाची ऑपरेशन्स यशस्वी
निसर्गाची लीला अपरंपार असं आपण नेहमी म्हणतो…कारण निसर्गाचे काही काही चमत्कार आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे असतात. म्हणून आपण नेहमीच म्हणतो निसर्गावर व्रूिाानाच्या ताकतीच्या आधारे आपल्याला नियंत्रण मिळवणे आतापर्यंत शक्य झाले नाही. असेच प्रकार औरंगाबादेतील एका रूग्णालयात समोर आले आहे. बहुतेक हे प्रकार आपल्या आजूबाजूला आहेत. मात्र ते आपल्याला माहीत नाहीत कारण लोक या बद्दल बोलण्यास तयार नाहीत.
१५- वसईत मुंबई- अहमदाबाद हायवेवर दोन बसेसची धडक होऊन भीषण अपघात, ४ जण जखमी
१६- नोएडामध्ये एकाच दिवशी एकाच परिसरातील तब्बल १८ घरामध्ये झाी चोरी, संतप्त रहिवाश्यांनी नोंदवला निषेध
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- प्रणव देखील एकेदिवशी आमच्या सोबत खेळेल - अजिंक्य
मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या एच.टी.भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत, प्रणव धनावडेने नाबाद १००९ धावांची खेळी केली. प्रणववर जागतिक विक्रम केल्याने, चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अजिंक्य म्हणाला...
अजिंक्यने प्रणवच्या खेळीचे विशाल असे वर्णन करुन एकदिवस तो भारतासाठी खेळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यक्तीगत नाबाद १००९ धावा करणे ही मोठी कामगिरी आहे. एकदिवस तो आमच्यासोबत खेळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता फक्त त्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष केंद्रीत करावे असे अजिंक्यने म्हटले आहे.
१८- दिल्ली-जयपूर हायवेवर झालेल्या अपघातात नदीम-श्रवण या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडीतील संगीतकार श्रवण झाले जखमी
~~~~~~~~~~~~~~~
समाजाचे नेतृत्व करणे हे सगळ्यांनाच खूप आवडते,
पण त्यासाठीचे कौशल्य फक्त काहींनाच सापडते..
यशाच्या आकाशात धर्तीवर राहणं, लोकहित पाहणं हे ज्यांना जमलं,
त्यांनाच निरंतर शास्वत राज्य करण्याचं खरं सूत्र उमजलं..
(सक्षणा सलगार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
मनीष कावळे, गोविंद बिडवई, अरुण काळे, विश्वास कदम, गोपाल भावसार, चंचलसिंग जाट, श्री पांचाल, सतीश गोपटवाड, साई आवळे, रवींद्र झाडे, आनंदा गाढे, कल्याण सूर्यवंशी, रणजीत जाधव, साईनाथ बुधेवार, दिनेशभाई सावलीया, अभिषेक चौहान, संतोष शिंदे, दादा गरड, बळी
डांगे,. महेश पाटील
~~~~~~~~~~~~~~~
आपल्या नवीन वर्षीच्या संकल्पांना आम्ही नमस्कार लाईव्हमधून प्रसिद्धी देवू.
पाठवा आपले संकल्प आम्हाला -
8975495656 या नंबर वर
आमच्या वाचकाचा संकल्प
१- "मी दररोज रोजनिशी लिहील"- रुपेश दरक, वसमत,
2- मी शारिरिक दूष्टया तंदुरूस्त राहन्यासाठी नियमित सुर्यनमस्कार व प्राणायाम करीन - गणेश कवडेवार, लातूर 9404464862
३- वाहन चालवितांना वेगावर नियंत्रण ठेवील- प्रवीण लढ्ढा, 9423441930
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५ ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment