Sunday, 3 January 2016

शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीत असलेल्या श्री सहयोग कॅटरर्स व डेकोरेटर्सच्या गोदामाला आग लागून प्रचंड नुकसान




नांदेडच्या औद्योगिक वसाहतीत आज सकाळी लागलेल्या आगीत एका टेंट हाउस गोदामात आग लागून जवळपास १० लाखाचे नुकसान झाले आहे. आज सकाळी ७ वाजेदरम्यान दडू बंकटलाल पुरोहित यांच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या टेंट हाउस (सहयोग सेवा) गोदामात आग लागली.निघणारे धुराचे लोट एवढे उंच जात होते कि आकाशात ढग आल्याची जाणीव होत होती. आसपासच्या लोकांनी अग्निशमन दलाला या बाबत सूचना केली आणि त्वरित पाण्याचे बंब आले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी सर्व काही सुरळीत असावे यासाठी प्रयत्न केले. या आगीत कोणा माणसाला काहीच इजा झाली नाही.पण या आगीने जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.आफिचे कारण समजू शकले नाही.










No comments: