Monday, 4 January 2016

नमस्कार लाईव्ह ०४-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०४-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- भारताचा पाकिस्तानला ७२ तासांचा अल्टीमेटम 

                        पंजाबमधील पठानकोट येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अल्टीमेटम दिला आहे. हे दहशदवादी जैश-ए-मोहम्मद असल्याचं समोर आलंय त्यामुळे या संघटनेविरोधात लगेचच कारवाई करण्यासाठी भारताने पाकिस्तानला सांगितलं आहे. भारताने पाकिस्तानला कारवाईसाठी ७२ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. जर जैश-ए-मोहम्मद या संघटनेवर कारवाई नाही केली तर १५ जानेवारी रोजी होणारी दोन्ही देशांमधील विदेश सचिव वार्ता रद्द केली जावू शकते.

~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- पठाणकोट हल्ला : सहा अतिरेक्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरुच 

                    गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पठाणकोट हवाईतळावर आज दोन अतिरेक्यांचे मृतदेह मिळाले. या चकमकीत एकूण सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं आहे. परंतु पठाणकोट हवाईतळावर नेमके किती दहशतवादी घुसले याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र हवाईदल, एनएसजी कमांडो आणि लष्कराच्या जवानांचं कॉम्बिंग ऑपरेशन अजूनही सुरु आहे. युनायटेड जिहाद कौन्सिलने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचं कळतं.हवाई दलाच्या ज्या इमारतीत दोन दहशतवादी लपून बसले होते, ती इमारत पाडण्यात आली. इमारतीच्या ढिगाऱ्यात दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. पठाणकोटमध्ये हवाई तळानजीकच्या एका इमारतीत हे दोन्ही दहशतवादी शिरले होते. तो रहिवासी परिसर असल्याने त्यांना शोधण्यात अडचणी येत होत्या.दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान दरम्यानची चर्चा रद्द होऊ शकते. दोन्ही देशांमध्ये 15 जानेवारीला परराष्ट्र सचिव स्तरावर चर्चा होणार आहे.

३- पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तामध्ये चर्चा रद्द होण्याची शक्यता. 

४- 1 एप्रिलपासून आयकरचे नवे नियम लागू होणार 

                 काळ्या पैशांवर निर्बंध घालण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) नवे नियम जारी केले आहेत. या अंतर्गत 1 एप्रिलपासून एका ठराविक रक्कमेपेक्षा अधिक व्यवहाराची माहिती आयकर विभागाला देणं बंधनकारक आहे.नव्या नियमानुसार, रोख उत्पन्न, शेअर्सची खरेदी, म्युचुअल फंड, स्थावर संपत्ती, फिक्स डिपॉझिट, परकीय चलन या संदर्भातील कोणताही व्यवहार करताना आयकर विभागाने निश्चित केलेल्या नव्या पद्धतीनुसार माहिती देणं अनिवार्य आहे. या अधिसूचनेनुसार 30 लाखांहून अधिक रकमेच्या सर्व अचल मालमत्तेच्या खरेदी-विकीची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे.याशिवाय कोणत्याही वस्तू आणि सेवेच्या विक्रीवर दोन लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम उत्पन्न मिळाल्यास त्यासंदर्भात आयकर विभागाला कळवावं लागेल. याशिवाय एकाद्या व्यक्तीच्या एक किंवा अधिक बँक खात्यामध्ये एका आर्थिक वर्षात दहा लाखांहून अधिक रुपये जमा झाल्यास त्याची माहिती आयकर विभागाला देणं आवश्यक आहे.बँकेतील फिक्स डिपॉझिटसाठी हा नियम लागू आहे. मात्र या डिपॉझिटच्या रिन्यूअलची माहिती देणं गरजेचं नाही. तसंच पोस्ट खात्यातील बचत आणि डिपॉझिटसाठीही हेच नियम लागून असतील, असं अर्थमंत्रालयाने सांगितलं.

५- आणखी दोन वाघांचा दुर्दैवी मृत्यू 

                       महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या जंगलात वाघांच्या मृत्यूच्या घटना घडत आहे. वाघांचे एकापाठोपाठ एक मृत्यू होतायत आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे हे कुणालाही कळू शकलेलं नाही. आज आणखी दोन वाघांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.गेल्या आठवड्यातच चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावलीच्या जंगलात वाघाच्या 4 बछड्यांचा मृत्यू झाला होता. वाघाच्या बछड्यांचा मृत्यू हा विषबाधेनं झाला असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मध्य प्रदेशमधल्या पेंच व्याघ्रप्रकल्पालगत एका वाघाचा विहिरीत बुडुन मृत्यू झालाय. या महामार्गापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरच्या विहिरीत पडून या वाघाचा मृत्यू झाला. तर नागपूरच्या बुटीबोरी वनक्षेत्रात रेल्वेच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झालाय.

६- नवनिर्वाचित ८ विधान परिषद सदस्य़ांचा उद्या दुपारी १ वाजता विधान भवनात होणार शपथविधी. 

७- पंजाब मोहालीमध्ये शस्त्रसाठा आणि पाकिस्तानी सीमकार्डसह तिघाजणांना अटक  
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- मुंबईतही वाहतुकीसाठी ‘सम-विषम’ प्रयोग करा, प्रताप सरनाईकांचं परिवहन मंत्र्यांना पत्र 

                   दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाहनांसाठी सम-विषम प्रयोग लागू केला आहे. यावरुन अनेक वाद-प्रतिवाद सुरु असतानाच, मुंबईतही अशाप्रकारे सम-विषमचा प्रयोग करावा, अशी शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्र्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.दिवसेंदिवस वाहन संख्या वाढत चालली आहे. शहर वाढले की, वाहनांची संख्याही वाढते. मुंबई आणि परिसरात तर वाहनांच्या संख्येत अफाट वाढ झाली आहे. प्रदूषण आणि वाहनकोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.सम-विषम नंबरनुसार वाहन रस्त्यावर चालवायचे, असं दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने हे पाऊल उचललं आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आलं असून दोन दिवसामध्ये प्रदूषणाच्या पातळीवर त्याचा परिणाम झाला आहे. मग मुंबई आणि एमएमआरडीए क्षेत्रातही असाच प्रयोग करायला काय हरकत आहे, अशा आशयचे पत्र प्रताप सरनाईक यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना धाडलं आहे.

९- यंदा म्हाडाच्या दहा हजार घरांसाठी लॉटरी 

                   म्हाडाने यंदा मुंबईसह सात विभागात सुमारे दहा हजार घरांच्या लॉटरीचं नियोजन केलं आहे. येत्या फेब्रुवारीत ठाणे, मीरा रोड, विरार आणि वेंगुर्ला इथल्या चार हजार 132 घरांची, तर मे महिन्यात मुंबईच्या विविध भागांतील सुमारे 1500 घरांच्या लॉटरीचा समावेश आहे.यंदाच्या वर्षात पाच ते साडेपाच हजार घरं उभी केली जाणार आहेत. मे 2016 पर्यंत ही लॉटरी निघेल.दुसरीकडे पुण्यातही एक हजार 325, नाशिकमध्ये 435, नागपूरमध्ये 564, औरंगाबादमध्ये 490 तर अमरावतीमध्ये 453 घरं उभी करण्यात येणार आहेत. या घरांची लॉटरीही यावर्षीच काढण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात डिजिटायजेशन न झाल्यामुळे केबल कनेक्शन खंडित झालेल्या लाखो ग्राहकांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास मोठा दिलासा दिला आहे. राज्यात सेट टॉप बॉक्स उपलब्ध नसल्याने डिजिटायजेशनला सहा आठवड्यांची स्थगिती देण्यात आली आहे. केबल संघटनेने दीड महिन्यांपूर्वी माहिती आणि प्रसारण खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत ही बाब त्यांच्या निदर्शनासही आणली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. याच बाबीबर नाशिकच्या केबल असोसिएशनं आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत केबल कनेक्शन बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं.तेलंगण आणि सिक्कीम राज्यानं केंद्राच्या या निर्णयाला स्थगिती दिल्याचं त्यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देतानाच हा निर्णय महाराष्ट्राला लागू आहे की नाही, याबाबतचा खुलासा करण्याची विनंती केली होती.न्यायमूर्ती कानडे आणि रेवती मोहिते दिरे यांच्या खंडपीठानं हा निर्णय संपूर्ण देशभरात लागू असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्यातल्या 35 लाख टीव्ही संचांची केबल सेवा पूर्ववत होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

१०- डिजिटायजेशनला तूर्तास स्थगिती, केबल सेवा पूर्ववत 

११- शहिदाची गौरवगाथा, दहशतवाद्यांची बंदूक खेचून त्यालाच कंठस्नान 

                             पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताने सात मोहरे गमावले आहेत. मात्र दहशतवाद्यांना कंठस्नान घालून शहिद झालेल्या कॉन्स्टेबल जगदिश सिंह यांची गौरवगाथा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानास्पद आहे.दहशतवाद्यांची बंदूक हिसकावून त्यालाच कंठस्नानदहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दहशतवादी खुल्या मैदानात गेले. त्यांच्या मागे डीएससी जवान जगदिश सिंह यांनी धाव घेतली. दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि तेवढ्यातच त्यांनी दहशतवाद्यांची बंदूक हिसकावून त्यालाच कंठस्नान घातलं.नंतर जगदिश यांनी उर्वरित दहशतवाद्यांचा पाठलाग सुरु केला. मात्र दुर्दैवाने या लढाईतच एक गोळी लागून ते शहिद झाले.पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला सुमारे 57 तास उलटले आहेत. मात्र, अद्यापही याठिकाणची चकमक थांबलेली नाही. कालपर्यंत पाच दहशतवाद्यांना ठार केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र लष्कराकडून याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.दुसरीकडे सरकारनं ऑपरेशन संपल्याची घोषणा करण्याची घाई केली. काल गृहमंत्रालयानं तातडीची पत्रकार परिषद घेत अजूनही ऑपरेशन सुरु असल्याची माहिती दिली. शिवाय या हल्ल्याचा अलर्ट आधीच दिला असल्याचाही दावा केला.नववर्षाच्या पहिल्याच रात्री म्हणजे शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला. पंजाबमधील पठाणकोट हवाईतळावर दहशतवादी घुसून त्यांनी गोळीबार केला. तेव्हापासून सुरु झालेली ही चकमक अद्याप सुरु आहे. या चकमकीत भारताचे सात जवान शहीद झाले.पठाणकोट हवाईतळावर नेमके किती अतिरेकी घुसले, याबाबतचा अधिकृत आकडाच अद्याप समजू शकलेला नाही.

१२- संपामुळे एसटी कर्मचार्‍यांचा सात दिवसांचा पगार कपात 

                      एस.टी. महामंडळातील कर्मचार्‍यांनी पगारवाढीसाठी इंटक संघटनेनं नुकताच संप केला होता. या संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांचा 1 दिवस संप केला असेल तर सात दिवसांचा पगार कपात होणार असा इशारा दिला गेला होता. नंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यंानी त्याची दखल घेतली. आणि एका दिवसासाठी एकच दिवसाचा पगार कपात केला जाईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र असं आश्वासन असतानाही कर्मचार्‍यांचा एका पेक्षा जास्त दिवसांचा पगार कपात करण्यात आलाय. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येतेय.एस टी कर्मचारी ना नियमानुसार सात दिवस पगार कापण्याची नोटीस दिली आहे. तो किती दिवस कापावा या बाबतीत माझ्याकडे प्रस्ताव येईल. त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. असं दिवाकर रावते यांनी म्हटलंय.

१३- क्रिकेटमध्ये सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्याची लोढा समितीची शिफारस. 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंविरोधात प्रणिती शिंदे मैदानात 
                     सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंच्याविरोधात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे मैदानात उतरल्या आहेत. याशिवाय माजी आमदार नरसय्या आडम म्हणजेच आडाम मास्तर यांनीही जिल्हाधिकाऱ्यांविरोधात मोर्चा काढला आहे.मागील काही दिवसापासून सोलापूरमध्ये सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेवरुन वादंग सुरु आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आराखड्याला देवस्थान समितीचा विरोध आहे. त्यामुळेच तुकाराम मुंढेंच्या विरोधात सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनीही दंड थोपटले आहेत.काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही तुकाराम मुंढेंना विरोध केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आराखड्यानुसार आपत्कालीन मार्गावर स्टॉल उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या रस्त्यावर मंडप उभारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.आपत्कालीन रस्ता परंपरेप्रमाणे देवस्थानाला खुला करावा या मागणीसाठी देवस्थान समितीच्या वतीनं तीन दिवसांपासून चक्री उपोषण सुरु आहे.

१५- थँक यू मुंबई पोलिस, 82 वर्षीय आजींच्या हाकेला साद 
                         सदैव मुंबईकरांच्या रक्षणासाठी तत्पर असलेल्या मुंबई पोलिसांमधील माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा मुंबईकरांना घडलं आहे. 82 वर्षांच्या आजींचा एकटेपणा घालवण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.82 वर्षीय ललिता सुब्रमण्यम माटुंगा परिसरात राहतात. मुलं परदेशात गेल्यामुळे मागील वीस वर्षांपासून त्या एकट्या राहतात. विदेशात असणारी त्यांची मुलं वर्षातून एक-दोनदा त्यांना भेटायला येतात. मात्र वर्षभर या ललिता आजीच्या हाकेला ओ देतं ते मुंबई पोलिस.पोलिस कर्मचारी त्यांना प्रेमानं मम्मी अशी हाक मारतात. पोलिसांनाही आता ललिता आजीचा लळा लागलाय. त्यांना कुठलीही अडचण आली की मुंबई पोलिसातील कर्मचारी त्यांच्या मदतीला धावून जातात.मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलिसांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात आदर वाढला आहे.

१६- परळ येथील गांधी रुग्णालयातील गोदामाला लागलेल्या आगीत भंगार सामान खाक, सर्व रुग्ण सुरक्षित आहेत मात्र रुग्णालय परिसरात धुराचे साम्राज्य 
                    परळच्या महात्मा गांधी मेमोरिअल रुग्णालयात मोठी आग लागली आहे. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे. ही आग कशामुळे लागली हे अस्पष्ट आहे.  मात्र रुग्णालयात आग लागल्यामुळे परिसरात भयभीतता पसरली आहे.सध्या अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

१७- संगमनेर दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं, प्रेमीयुगुलाची मित्रांनीच केली हत्या 
                      नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झालाय. नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील बोटा गावानजिक कस नदीच्या जवळ शेतात जळालेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह 30 डिसेंबर रोजी मिळाले होते या दोघांचा नेमका खून झालाय की आत्महत्या याचा उलगडा घारगाव पोलिसांनी केला असून घरातून पळून जाण्यात मदत करणारे मित्रच या दोघांचे मारेकरी असल्याच समोर आलं आहे.मयत युवती अल्पवयीन असून शर्वरी अनिल फडके वय 16 ही नाशिकची रहिवासी आहे. तर मयत मुलगा अमन अशोक सिंग वय 19 हा मुंबईचा रहिवासी असून नाशिक येथे एकत्र शिक्षण घेत असतांना दोघांचे प्रेम प्रकरण सुरू होते. नोव्हेंबर महिन्यात या दोघांनी नाशिक येथून पळून जात निफाड, शिर्डी , पुणे आणि शेवटी चाकण या ठिकाणी मुक्काम केला. या दरम्यान पळून जाण्यात त्यांना पंकज भिकुदास सोनवणे याने मदत केली.29 डिसेंबर ला पंकज आपल्या दोन मित्रांसह यांना भेटण्यासाठी चाकणला गेला आणि तिथून त्यांना परत घेऊन येत असताना पंकज आणि त्याच्या अन्य दोन मित्रांनी या दोघांचा चाकूचे वार करून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांच्या अंगावर पेट्रोल टाकून पळ काढल्याचं समोर आले आहे.दरम्यान, घारगाव पोलिसांना तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोघांनाही जाळण्यात आल्याने ओळख पटवण्याचं अवघड काम पोलिसांना करायचं होतं. दोघांच्या चप्पल आणी मुलीच्या गळ्यातील साखळी एवढ्याचं वस्तू पोलिसांना मिळाल्या होत्या. केवळ सापडलेल्या सोन्याच्या साखळीवरून या घटनेचा तपास लागला आहे. अशोकसिंग याचा मित्र पंकज भिकूदास सोनवणे, विजय राजेंद्र काचे, राहुल राजेंद्र गोतिसे या तिघांनी खून केल्याच उघड केलंय.

१८- लडाखमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत लष्कराच्या चार जवानांचा मृत्यू  
१९- नाशिकमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात होऊन आई व मुलगा ठार 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- BCCI मध्ये मंत्री, शासकीय कर्मचाऱ्यांना स्थान नको', लोढा समितीची सूचना

                         आयपीएलमधल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी प्रतिमा मलिन झालेल्या बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस लोढा समितीनं एक राज्य एक असोसिएशनची शिफारस करून सर्वात मोठा धक्का दिला आहे.बीसीसीआयच्या निवडणुकांत एका राज्याला एकाचा मताचा अधिकार मिळेल. लोढा समितीच्या या शिफारशीचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना बसू शकतो. कारण या दोन्ही राज्यांमध्ये तीन-तीन स्वतंत्र असोसिएशन्स आहेत.बीसीसीआयच्या प्रशासनात मंत्री आणि शासकीय कर्मचारी यांना स्थान नसेल, अशीही शिफारस करून लोढा समितीनं बीसीसीआयला क्लीन बोल्ड केलं आहे. लोढा समितीचा बीसीसीआय आणि आयपीएल या दोन्हीचा कारभार पाहण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणांची शिफारस केली आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२१- ब्राह्मण समाजाचा 18वा उपवधू-उपवर परिचय मेळावा 10 जानेवारीला
http://goo.gl/V0qx7l
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हाव लागतं.
दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं.. जीवन यालाच म्हणायच असतं..
दुःख असुनही दाखवायचं नसतं..
अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..:
[सोवन साहू, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
आपल्या नवीन वर्षीच्या संकल्पांना आम्ही नमस्कार लाईव्हमधून प्रसिद्धी देवू.
पाठवा आपले संकल्प आम्हाला -
 8975495656 या नंबर वर
आमच्या वाचकाचा संकल्प
१- "मी दररोज रोजनिशी लिहील"- रुपेश दरक, वसमत,
2- मी शारिरिक दूष्टया तंदुरूस्त राहन्यासाठी नियमित सुर्यनमस्कार व प्राणायाम करीन - गणेश कवडेवार, लातूर 9404464862
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नमस्कार लाईव्हमध्ये डिसेंबर महिन्यात २७५ नवीन ग्रुप अड्ड झालेत
सर्व नवीन ग्रुपचे हार्दिक स्वागत.
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: