Sunday, 3 January 2016

नमस्कार लाईव्ह ०३-०१-२०१६ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०३-०१-२०१६ चे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- पदभार सांभाळल्यानंतर २४ तासांत मेक्सिकोच्या महापौरांची हत्या 

                     मेक्सिकोमध्ये नवनिर्वाचित महिला महापौराला पदभार सांभाळल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांची हत्या करण्यात आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिसेलो मोता यांनी शुक्रवारी टेमिक्ससो शहराच्या महापौरपदाची शपथ घेतली. पदभार स्वीकारून अवघे २४ तास लोटत नाहीत तोच काही बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला.  दरम्यान, मोता यांची हत्या करणाऱ्या संशयित हल्लेखोरांना अटक करण्यात आल्याची माहिती मोरेलोस राज्याचे गर्व्हनर ग्रेसो रामिरेज यांनी दिली.

~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- पठाणकोटमध्ये पुन्हा गोळीबार सुरु, एनएसजीची टीम घटनास्थळी दाखल 

                    पंजाबमधील पठाणकोट हवाईतळावर पुन्हा एकदा गोळीबार सुरु झाला आहे. एनएसजीची टीम आणि पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. एनएसजीकडून सर्च ऑपरेशनही सुरु करण्यापात आलं आहे. गोळीबाराचे दोन राऊंड झाल्याची माहिती मिळते आहे. मात्र, हा गोळीबार दहशतवाद्यांनीच केला आहे, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाही. अनेकदा सर्च ऑपरेशदरम्यान काही संशयास्पद आढळल्यास सैन्याकडून गोळीबार केला जातो. दरम्यान, काल पाच दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं. 3 भारतीय जवानांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. पण आज पुन्हा गोळीबाराच आवाज आल्यानं दहशतवादी अजूनही एअरफोर्स स्टेशनच्या आता असल्याची शक्यता आहे.

३- दिल्ली-कानपूर ट्रेनला येत्या 72 तासांत बॉम्बने उडवू, मुंबई एटीएसला धमकीचा ई-मेल, तपासणीनंतर शताब्दी एक्सप्रेस रवाना 

                 दिल्लीहून कानपूरला जाणाऱ्या ट्रेनला बॉम्बने उडवण्यची देण्यात आली आहे. मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाला म्हणजेच एटीएसला एका ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास मुंबई एटीएसला धमकीचा मेल आला. येत्या 72 तासांत दिल्लीहून कानपूरला जाणाऱ्या ट्रेनला उडवून देऊ, अशी धमकी या मेलमधून देण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीहून लखनऊला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर शताब्दी एक्स्प्रेस गाझियाबाद रेल्वेस्थानकावर ट्रेन थांबवून तपास सुरु करण्यात आला आहे.बॉम्बशोधक पथक, श्वानपथक आणि मेटल डिटेक्टर्सद्वारे गाडीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर गाडी रवाना झालीय. इतर गाड्याही थांबवण्यात आल्या होत्या. त्याही आता रवाना करण्यात आल्यात

४- रेल्वे स्थानकांवर मिळणार २० रुपयांहूनही कमी किंमतीत जेवण 

                   आता तुम्हाला रेल्वे स्थानकांवर स्वच्छ आणि पौष्टिक जेवण मिळणार आहे. अवघ्या २० रुपयांत तुम्ही हे जेवण विकत घेऊ शकता. आयआरसीटीसीने भारतीय रेल्वे नेटवर्क स्थानकांवर जन आहार कॅफेची सुरुवात केलीय.या कॅफेत २० रुपयांत तुम्ही जेवण घेऊ शकता. सेल्फ सर्व्हिस मॉडेलवर आधारित ही सुविधा २४ तास सुरु राहणार आहे. येथे मिळणाऱ्या बऱ्याच पदार्थांच्या किंमती २० रुपयाहूनही कमी असतील. या काउंटरवर आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स आणि गरम पेयही उपलब्ध असतील. याशिवाय रिव्हर्स ऑसमोसिस प्रक्रियेने फिल्टर केलेले पाणीही उपलब्ध होणार आहे. या कॅफेत बसण्याची सुविधाही आहे.

५- पठाणकोटमध्ये बॉम्ब निकामी करताना झाला स्फोट, 4 जवान जखमी 

                       पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर आज (रविवारी) सकाळी पुन्हा एकदा स्फोटाचा आवाज झाल्याने खळबळ उडाली. मात्र, बॉम्ब निकामी करत असताना अपघाताने हा स्फोट झाल्याचं नंतर स्पष्ट झालं आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, या स्फोटात 4 जवान जखमी झाला असून त्यातला एका जवानाची प्रकृती गंभीर आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पठाणकोट हवाई दल तळावर दहशतवादी हल्ल्याला 30 तास उलटून गेले तरी अद्याप कॉम्बिंग ऑपरेशन संपलेलं नाही. आतापर्यंत 5 दहशतवाद्यांचे मृतदेह हाती लागले असून संपूर्ण परिसरावर हेलिकॉप्टरच्या मदतीने करडी नजर ठेवली जात आहे. एनएसजी आणि भारतीय लष्कराचं पथक अजूनही हवाई दल तळावर असल्याची माहिती देण्यात आली. आज शोधमोहीम सुरू असतानाच अचानक स्फोट झाल्याने सुरक्षा यंत्रण हादरल्या होत्या. एअरबेसच्या आतून गोळीबाराचा आवाज येतोय, अशी माहिती नागरिकांमध्ये परसली होती. पण तसं काहीही नव्हतं. दहशतवाद्यांनी ठेवलेला बॉम्ब निकामी करत असताना हा स्फोट झाल्याचं नंतर स्पष्ट झालं. तरीही हा स्फोट नेमका कसा घडला, याचा शोध घेतला जात आहे.

६- ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए बी वर्धन यांचं निधन 

                    भाकपचे माजी महासचिव ए. बी. वर्धन यांचं दिल्लीच्या एका खासगी रुग्णालयात रात्री 8.30 वाजता निधन झालं. वयाच्या 91 वर्षी दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. ते मूळचे नागपूरचे होते. गेल्या महिन्यात त्यांना पॅरालिसीसचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र प्रकृती खालावल्याने वर्धन यांचं निधन झालं. राज्यातील डाव्या विचारसरणीच्या नेत्यांमध्ये त्याचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. अर्धेंदू भूषण वर्धन म्हणजेच ए. बी. वर्धन यांचा जन्म 24 सप्टेंबर 1924 रोजी जन्म झाला. 1957 मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर 1990 साली ते दिल्लीच्या राजकारणात गेले.

~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- मुंबईत बाईकस्वारानं पोलीस कॉन्स्टेबलला चिरडलं! 

                   मुंबईत अत्यंत बेभान होऊन वेगवान बाईक चालवत एका बाईकस्वारानं पोलीस कॉन्स्टेबलला चिरडल्याची घटना घडली आहे. मुंबईतील सायन परिसरात ही घटना घडली.पोलीस कॉन्स्टेबल नितीन पवार यांनी या बाईकस्वाराला थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यानं गाडी न थांबवता सरळ पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर चढवली. यात नितीन परब हे कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाले आहेत. सायन हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन बंद, पोलीस कॉन्स्टेबल मरणासन्न अवस्थेत अपघातानंतर या पोलीस कॉन्स्टेबल नितीन परब यांना सायन रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथेही प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या फटका या परब यांना बसला आहे. रुग्णालयाचं सिटीस्कॅन मशीन बंद असल्यानं त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. सीटीस्कॅन मशीन दुरुस्त करणारा कारागिरही नसल्यानं हे पोलीस कॉन्स्टेबल मरणासन्न अवस्थेत सायन हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

८- पद्मभूषणसाठी आशा पारेख यांचं लॉबिंग : गडकरी 

                  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच दिल्लीत पद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग होत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी काहीही करुन पद्मभूषण देण्याची मागणी केल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग होत असल्याचा दावा अनेक वेळा झाला आहे. मात्र आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच दिल्लीत पद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग होत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. माझ्या इमारतीची लिफ्ट बंद होती, मात्र आशा पारेख तब्बल 12 मजले चढून आल्या होत्या, असंही गडकरींनी म्हटलं आहे. मला पद्मभूषण हवा आहे, त्यासाठी काहीही करा अशी गळ पारेख यांनी घातल्याचं गडकरींनी म्हटलंय.

९- मुंबईला पाणी पुरवणारी पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया 

                      मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. माहिममधील झोपडपट्टी परिसरात पाईपलाईन फुटून पाण्याचे उंचच उंच फवारे उडत आहेत. मुंबईत पाणीटंचाईचा प्रश्न असताना पाईपलाईन फुटल्याने काळजी व्यक्त केली जात आहे. या भागात अनेकवेळा पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडत असल्यामुळे पाईपलाईन फुटली की फोडली जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१०- मुंबईत मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मेगाब्लॉक. 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- रत्नागिरीत ‘हवेत’ साखरपुडा! पॅरासिलिंग करत प्रेमी युगुलाने बांधल्या आयुष्याच्या गाठी 

                         दापोली येथील मुरुड-कर्दे समुद्र किनाऱ्यावर अनोखा साखरपुडा सोहळा पार पडला. मनाली वाळिंबे आणि रोहन कुलकर्णी यांनी चक्क प्यारासेलिंगच्या माध्यमातून समुद्रात उंच भरारी घेत एकमेकांना अंगठी घातली. मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर दोन बोटी साखरपुड्या करिता सजवण्यात आल्या होत्या. बोटीने किनारा सोडल्यानंतर काही मिनिटातच मनाली वाळिंबे आणि रोहन कुलकर्णी यांनी प्यारासेलिंगच्या माध्यमातून उंच आकाशात भरारी घेतली आणि उंच आकाशात असतानाच या दोघांनी एकमेकांना अंगठी घातली. या अनोख्या साखरपुड्याची दापोलीत चांगलीच चर्चा रंगलेली पहायला मिळते आहे.

१२- पुण्यातील 3 विद्यार्थी छत्तीसगडमधून बेपत्ता, नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याची भीती 

                    भारत जोडो अभियानात सहभागी झालेल्या पुण्यातील तीन विद्यार्थी छत्तीसगडमधून गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे विद्यार्थी पुणे ते ओडिशा व्हाया छत्तीसगड दरम्यानच्या सायकल रॅलीत सहभागी झाले होते. विकास वाळके, आदर्श पाटील आणि श्रीकृष्णा शेवाळे अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. हे विद्यार्थी 22 डिसेंबरला पुण्यातून सायकल चालवत छत्तीसगडमार्गे ओडिशात जाणार होते. मात्र हे मधूनच बेपत्ता झाले. नक्षलवाद्यांनी या तीन विद्यार्थ्यांचं अपहरण केल्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे. छत्तीसगडमधील बासागुडा इथं या विद्यार्थ्यांचं शेवटचं लोकेशन ट्रेस झालं आहे. यामुळं या विद्यार्थ्यांचं कुणी अपहरण केलं, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

१३- पिंपरीत संघाचा ‘शिवशक्ती संगम’ सोहळा, लाखो स्वयंसेवकांना सरसंघचालक मार्गदर्शन करणार 

                      राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वयंसेवकांना एकत्रित करण्यासाठी आज पिंपरीमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तब्बल 400 एकर जागेवर शिवशक्ती संगमाच्या कार्यक्रमासाठी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी भव्य देखावा उभारला आहे. या नऊमजली देखाव्यावरून सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. कार्यक्रमाच्या परिसरात प्लास्टिकचा वापर टाळण्यात आला आहे. शिवशक्ती संगम कार्यक्रमानंतर स्वयंसेवकांच्या परतीच्या प्रवासात त्यांच्या भोजनाचा प्रश्न चुटकीसरशी मिटवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मॅनेजमेंटचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. यासाठी शिदोरी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. याअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील एक लाख घरांमधून ही शिदोरी मागण्यात आली आहे. यामध्ये 10 तिखट-मिठाच्या पुऱ्या, शेंगदाण्याची चटणी आणि 2 तिळाचे लाडू देण्याची विनंती संघाकडून करण्यात आली आहे. आज कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित स्वयंसेवकांना ही शिदोरी वितरीत करण्यात येणार आहे.

१४- मुंबई; प्रेयसीच्या नकाराने तरुणाची आत्महत्या 

                   विवाहित प्रेयसी लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याने रोशन सावंत (२५) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या करण्याची घटना ३१ डिसेंबरच्या रात्री दहिसर येथे घडली. पतीपासून विभक्त रहात असलेल्या एका तरुणीशी गेल्या काही महिन्यांपासून त्याचे संबंध होते. पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याचे तिने सांगितल्याने निराश होऊन त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. गेल्या महिनाभरापासून दोघे दहिसर येथे भाड्याची खोली घेऊन एकत्र राहत होते. रोशन सावंत हा काही महिन्यापूर्वी अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करीत होता. त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका २४ वर्षीय विवाहित तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. तिचा पती कोकणात राहात असून, त्यांना सहा वर्षांची एक मुलगी आहे. पतीशी पटत नसल्याने ती तिच्या आईकडे मार्वे रोड येथे राहते. सध्या ती मालाडमध्ये मार्केटिंगचे काम करते. पतीपासून तिने घटस्फोट मागितला असून, हे प्रकरण कुटुंब न्यायालयात प्रलंबित आहे. घटस्फोट मिळाल्याशिवाय तुझ्याशी लग्न करणार नाही, असे तिने रोशनला सांगितले होते. तो मात्र, तिच्याशी लग्न करण्यास आतूर झाला होता, त्यावरून त्यांचात अनेकदा भांडणही होत. रोशनच्या भावानेच या प्रकरणी दोघांमध्ये मध्यस्थी करून भांडण मिटवले होते, तसेच घटस्फोट झाल्याशिवाय लग्न करू नको, असेही बजावल्याने तो निराश झाला होता.

~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१५- कॉमेडी नाईट्स सुरूच राहणार, पण दुसरा घेणार कपिलची जागा

                             कॉमेडी स्टार कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स हा शो बंद होणार आहे. पण चॅनेलने कपिलच्या जुन्या प्रतिस्पर्धींसोबत नवा शो सुरु करण्याची तयारी केली आहे.कपिल शर्माच्या जागी नवा अँकर येत असल्याने अनेकांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्ती केली आहे. त्यामुळे चॅनेलने नवा शो सुरू करण्याचं ठरवलं आहे. ज्याचं नाव असणार आहे कॉमेडी नाईट्स बचाव.नव्या शोचं होस्टींग त्याचेच जुने सहकारी करतील. सध्या कॉमेडी सर्कस मधील कपिलचे प्रतिस्पर्धी गोंविदा याचा भाचा कृष्णा अभिषेक हे या शोचं होस्टींग करत आहे. शिवाय भारती, सुदेश लेहरी, करन वाही यासारखे स्टार्सही या शोमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. पण यामुळे कपिलचे फॅन नाराज झाले आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१६- पोलीस स्थापना दिन उत्साहात साजरा 
१७- नांदेड पोलीस मुख्यालय येथे उद्या शस्र प्रदर्शन 
१८- आरोग्य सेवा पुरविण्यात नांदेड राज्यात प्रथम 
१९- युवकांच्या चळवळीने गावे बदलतील - जिल्हाधिकारी काकाणी 
२०- मुलांच्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी महोत्सव आवश्यक - आ. वसंतराव चव्हाण 
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२१- या मुलीचा बाथरुम मधील एमएमएस झालाय व्हायरल; अश्लील एमएमएम शौकिनांनी हा जरूर पाहावा
http://goo.gl/KeHkfF
~~~~~~~~~~~~~~~
२२- नांदेड मनपाची आजची अर्थ व्यवस्था म्हणजे बुडत्याचा पाय खोलात
http://goo.gl/JLUOEz
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
मोत्यानां तर सवयच असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते,
सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची... कधीतरी धागा बनुन पहा...
आयुष्य सुंदर वाटेल...
[विठ्ठल धर्माधिकारी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
मनोज जैश्वाल, अमोल चाक्रवार, विजय पद्मजा, राघवेंद्र मोदी, रोहित सिंघल, अजय कांबळे, किशोर परदेसी, मोहम्मद सोहिल, एकनाथ कदम, अतुल बागडी, संतोष पाटील, अभिजित भालके, अमोल कदम
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नमस्कार लाईव्हमध्ये डिसेंबर महिन्यात २७५ नवीन ग्रुप अॅड झालेत
सर्व नवीन ग्रुपचे हार्दिक स्वागत.
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: