नमस्कार लाईव्ह ०१-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- गोव्यातील प्रसिद्ध उद्योगपती व माजी आमदार अनिल साळगावकर यांचे सिंगापूर येथे निधन.
----------------------
>>> नव्या वर्षाच्या सुरवातीलाच मेसेजिंग अॅप व्हॉटस अक्षरश: ढेपाळलं.
नव्या वर्षाच्या सुरवातीलाच मेसेजिंग अॅप व्हॉटस अक्षरश: ढेपाळलं. काल मध्यरात्री बराच वेळ व्हॉट्स अॅप बंद होतं. नववर्षाच्या शुभेच्छांचा भार न सोसवल्याने व्हॉट्सअॅप मात्र कोलमडून मेसेजेसचा अतिरिक्त भार पडल्याने काल मध्यरात्री व्हॉट्सअॅप अचानक क्रॅश झालं. यामुळे युजर्सना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. व्हॉट्सअॅपने घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला व्हॉट्सअॅप क्रॅश झाल्यानं फक्त देशातीलच नव्हे तर जगभरातील यूजर्स अस्वस्थ होते. भारतासह युरोपमध्ये जवळजवळ 45 मिनिटं व्हॉट्सअॅप बंद होतं. मोठ्या प्रमाणात न्यू ईअरचे मेसेजेस पाठविल्याने अचानक व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरवरील ताण वाढला. त्यामुळे मेसेज जाण बंद झालं. मात्र, यावर व्हॉट्सअॅपने तात्काळ काम सुरु करुन त्यांची सेवा पूर्वव्रत केली.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- मोदींच्या तोंडून गांधी, बुद्ध येत असेल,तर त्यांचं स्वागत करावं : श्रीपाल सबनीस
गोध्रा हत्याकांडामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कलंकित झाले आहे. पंतप्रधानपदाचं समर्थन करतो, पण मोदींचं नाही. पण मोदींच्या तोंडून गांधी, बुद्धांचं नाव येत आहे, त्याचं स्वागत करायला हवं, असं अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस म्हणाले. पुण्यात बोलताना सबनीस यांनी मोदींचा एकेरी उल्लेख करून जहरी टीका केली होती. गोध्रा हत्याकांडातील मोदी हा कलंकित मोदी होता. तो माझ्या लायकीचा पंतप्रधान नाही. मोदींनी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे म्हणजे मरायची लक्षणे होती. त्यामुळे पाडगावकरांआधीच मोदींना श्रद्धांजली द्यायची वेळ आली असती, असं सबनीस म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर सबनीस यांनी माझा कट्टावर आपली मतं मांडली. “मीडियाने मोदींबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मी जे बोललो ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी वेगवेगळं छापलं आहे. त्यामुळे मीडियाने पक्षपात करू नये” असं सबनीस म्हणाले.
३- नोकरी सोडायची तर 50 लाख भरा, एअर इंडियाचा कर्मचार्यांना दणका
एअर इंडियाने आपल्या कर्मचार्यांना नव्या वर्षाची भेट देत चांगलाच धक्का दिलाय. 5 वर्षांच्या आत नोकरी सोडायची असेल, तर एकूण 50 लाख रुपये भरा असा नियमच केला आहे. आधीही रक्कम 10 लाख होती पण ती आता 4 पट्टीने वाढवलीये. नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहणार्या एअर इंडियानं पायलटस्साठी कडक नियम केला आहे. 5 वर्षांच्या आत नोकरी सोडायची असेल, तर एकूण 50 लाख रुपये आता भरावे लागणार आहेत आधीही ही रक्कम 10 लाख होती पण पायलटस्ना घेणारी एअरलाईन ही रक्कम आरामात भरून टाकायची. त्यामुळे आता हा दंड 50 लाख केलाय. होतं असं की, एअर इंडिया पायलटस्च्या प्रशिक्षणावर लाखो रुपये खर्च करते आणि अवघ्या काही महिन्यांत किंवा वर्षात हे पायलट दुसर्या एअरलाईनमध्ये जातात. त्यामुळे त्यांच्यावर एअर इंडियानं खर्च केलेले पैसे वसूल होत नाहीत.
४-हैदराबाद : पाकिस्तानी गायकाला विमानतळावरुन परत पाठवलं
प्रसिद्ध पाकिस्तानी गायक उस्ताद राहत फतेह अली खान यांना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल विमानतळावरुन परत पाठवलं आहे. राहत फतेह अली खान गुरुवारी अमिरातच्या विमानाने हैदराबादला आले होते. पण त्यांना तिथून अबू धाबीला पाठवण्यात आलं. या आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्यांना परत पाठवलं. राहत फतेह अली खान नववर्षाच्या कार्यक्रमासाठी हैदराबादमध्ये येणार होते. ताजफलकनुमा पॅलेसमध्ये सूफी संगीत कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. नियमानुसार, कोणीही पाकिस्तानी नागरिक हैदरबादमार्गे भारतात येऊ शकत नाही. पाकिस्तानी नागरिक दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई विमानतळावरुनच भारतात प्रवेश करु शकतात. या चार मेट्रो शहरांशिवाय जर एखाद्या पाकिस्तानी नागरिकाने दुसऱ्या कोणत्याही विमानतळावरुन प्रवेश केला तर ते त्याची नोंदणी होत नाही, यामुळेच पाकिस्तानी गायक फतेह अली खान यांना परत पाठवण्यात आलं. भारतात येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी ही व्यवस्था आहे. राहत फतेह अली खान यांचा कार्यक्रम रात्री आठ वाजता ठरला होता. पण विमानतळावर रोखल्याने त्यांच्या कार्यक्रमाची वेळ 11 वाजता करण्यात आली. विमानतळावरुन राहत फतेह अली खान यांना परत पाठवण्याची माहिती आयोजकांना मिळाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारशी संबंधित विभाग आणि गृहमंत्रालयाशी संपर्क केला आणि फतेह अली खान यांना हैदराबादला आणण्याची व्यवस्था केली.
५- संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद
संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना स्वस्त दरात मिळणारा जेवण आजपासून महाग करण्यात आलं आहे. त्यामुळे खासदारांच्या खिशाला चाप बसणार आहे. खासदारांना मिळणारा स्वस्त दरातला भोजन यावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. संसदेच्या कॅन्टीनमध्ये स्वस्त दरात अन्न मिळावा यासाठी 16 कोटी रूपयांची सब्सिडी दिली जात होती. ही सब्सिडी शुक्रवारपासून बंद करून नो प्रॉफिट, नो लॉस या आधारावर कॅन्टीन चालविण्यात येणार आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पुढाकार घेतल्याचं सांगण्यात येत आहे. नव्या निर्णयामुळे शाकाहारी थाली 18 रूपयांवरुन 30 रूपये करण्यात आली आहे. तर, 33 रूपयांत मिळणारी मांसाहारी थाली 60 रूपयाला मिळणार. थ्री-कोर्स मील 61 रूपयांवरून 90 रूपये करण्यात आली आहे. 29 रूपयाला मिळणारी चिकन करी आता 40 रूपयाला मिळणार आहे. कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांच्या किंमतीत तब्बल सह वर्षांनंतर बदल होत असून यापुढे वेळोवेळी किमतीचे वेळोवेळी परिक्षण केले जाणार असल्याचं लोकसभा सचिवालयाने स्पष्ट केलं आहे.
६- नव्या वर्षाची महागाईने सुरवात, विनाअनुदानीत घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला
७- अन्न, विज, पाणी, वाहतूक यांच्या किमतीबरोबरच देशात अपराध आणि असहिष्णुता वाढत असल्यामुळे लोक दु:खी आहेत - पी. चिदंबरम
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- भीमा कोरेगावमध्ये विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी लोटला भीमसागर
महार सैनिकांनी सुमारे 200 वर्षां पूर्वी गाजवलेल्या शौर्याला सलामी देण्यासाठी आज भीमा कोरेगावमध्ये विजयस्तंभाला सलमी देण्यासाठी भीमसागर उसळला आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या शौर्याल्या सलाम करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल झाले आहेत. आज 1 जानेवारी नव वर्षाचा पहिला दिवस…आजच्या दिवशी पुण्याजवळील कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखो भीम सैनिक येत असतात. या विजयस्तंभाला एक ऐतिहासिक महत्त्वही आहे.1818 साली म्हणजेच सुमारे 200 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ब्रिटीश सैन्यातल्या महार रेजिमेंटनं सामजिक विषमता निर्माण करणार्या पेशव्यांचा पाडाव केला होता. भिमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 या दिवशी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखाली महार बटालियनच्या 500 सैनिकांनी 25,000 पेशवे सैन्याचा पराभव केला होता.पेशव्यांबरोबर झालेल्या लढाईत महारांना यश मिळालं आणि तेव्हा क्षुद्र म्हणून हिणवल्या जाणार्या दलित अत्याचाराला आळा बसायला सुरुवात झाली होती. त्या लढाईत अनेक महार सैनिक शहीद झाले होते. त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून पुण्याजवळील कोरेगाव भीमा येथे हा विजयस्तंभ उभारला गेला होता. त्याच विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी हे भीमसैनिक इथं जमले. या विजयस्तंभला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी लाखो भीम सैनिक येतात. आजही या ठिकाणी राज्यभरातील दलित एकवटले आहेत. त्यांच्याकडून या विजयस्तंभला सलामी दिली जाते.
९- सोलापूर, अहमदनगरमध्ये दुष्काळ जाहीर होणार
सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होणार आहे. 15 जानेवारीपर्यंत आणेवारीचा अहवाल द्या, असा आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन्ही जिल्ह्यात रब्बी पिकांचं किती नुकसान झालं, त्याची आकडेवारी आल्यावर तिथे दुष्काळ जाहीर करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. रब्बी पीक घेणारे जिल्हे अशी सोलापूर आणि अहमदनगरची ओळख आहे. पण यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने आता हे दोन्ही जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होणार आहे.
१०- दिल्लीत सम विषम फॉर्म्युलामध्ये खासदार सत्यपाल सिंह अडकले
भाजपचे खासदार आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांना इंडिया गेटजवळ पोलिसांनी रोखलं. सम क्रमांकाची गाडी घेऊन रस्त्यावर उतरल्याने सत्यपाल सिंह यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. राजधानी दिल्लीमध्ये आजपासून सम-विषम फॉर्म्युला लागू झाला आहे. प्रदूषण आणि वाहतूक कोंडी या समस्यांवर उपाय म्हणून केजरीवाल सरकारने दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय आज 1 जानेवारीला दिल्लीत 1,3,5,7 आणि 9 या विषम नंबरच्या खासगी गाड्या चालवण्याची परवानगी मात्र सत्यपाल सिंह सम क्रमांकाच्या गाडीने प्रवास करत होते, त्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवलं. सत्यपाल सिंह यांच्या गाडीला चालान लावलं नाही, पण पोलिसाने त्यांना सम-विषम फॉर्म्युलाच्या नियमांचं पत्रक दिलं.
११- दिघावासीयांना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा
दिघा अनधिकृत इमारती प्रकरणी हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. 9 इमारती खाली करण्याच्या कारवाईला हायकोर्टाने 7 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र कारवाईची टांगती तलवार अजूनही कायम आहे. प्रशासन याठिकाणी आजपासून कारवाईस सुरूवात करणार होतं. कोर्टाचा हा आदेश केवळ 9 इमारतीसाठी लागू आहे. उर्वरीत 81 इमारतीवर मात्र केव्हाही हातोडा पडू शकतो. प्रशासनाच्या कारवाईमुळे तब्बल 1500 पीडीत कुटुंबांवर नववर्षाच्या तोंडावरच बेघर होण्याची वेळ येवून ठेपलेली आहे.
१२- छोटा शकील याचा विश्वासू सहकारी अब्बास याला ७ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- मुंबई - ६० हजार रिक्षा परवान्यांचं ऑनलाइन पद्धतीने फेरवाटप करणार - परिवाहन मंत्री दिवाकर रावते
१४- जम्मू-काश्मीर: श्रीनगरमधील जामा मशिदीबाहेर संरक्षण दलाच्या जवानांवर दगडफेक
१५- जम्मू-काश्मीरमधील सरकारी इमारती आणि वाहनांवर राज्याचा ध्वज लावण्याच्या आदेशाला स्थगिती - जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आदेश.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१६- पाकिस्तान टीममध्ये आगामी न्यूझीलँड दौऱ्यासाठी मोहम्मद आमिरची निवड
१७- अभिनेत्री विद्या बालनला रुग्णालयातून डिस्चार्ज
१८- उत्तर प्रदेशमधील हापुर सामूहिक बलात्कार प्रकरणी एका व्यक्तीला अटक
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१९- ९ व १० जानेवारीला देगलूर येथे सर्व महापुरुषांचा एकत्रित जयंती सोहळा व व्याख्यानपर कार्यक्रमाचे आयोजन
http://goo.gl/bEj6OJ
~~~~~~~~~~~~~~~
२०- सदृढ आरोग्यासाठी किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज - सौ. वर्षाताई भोसीकर
http://goo.gl/gofOTm
~~~~~~~~~~~~~~~
२१- हागणदारीमुक्तीसाठी प्रस्तावित ग्रामपंचायतींची येत्या 4 जानेवारी पासून होणार तपासणी
http://goo.gl/TpoUyP
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
अपूर्ण ज्ञान अभिमन्यूच्या चाक्रव्युव्हासारखे असते, स्वताचे आपले विचार बनविण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या आचारविचारांची कॉपी केली तर अलिबाबा अन चाळीस-चोर मधल्या अलिबाबाच्या भावासारखी फजिती होण्याची शक्यता असते.
[रमेश गोनार, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
नरेंद्र मोदींचा अचानक पाकिस्तान दौरा भारतासाठी फायदेशीर आहे का?
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - सुरेश मोरे, अध्यक्ष युवा भाजपा, लोहा
http://goo.gl/0b58sT
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
Choco-N-Nuts
चॉकलेट व ड्राय फ्रुट्स
सर्व प्रकारचे Dry Fruits उपलब्ध.
विविध प्रकारच्या आकारात चॉकलेट
जैन मंदिर जवळ, मारवाडी धर्मशाळेच्या समोर,
वजिराबाद, नांदेड
देशमुख- 9881788080
अग्रवाल- 8408822202
२ जानेवारीपासून भव्य शुभारंभ
अधिक माहितीसाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/MC3JcO
*****************
नवीन वर्षाचे आपले संकल्प कळवा नमस्कार लाईव्हला. आपल्या नवीन संकल्पांना नमस्कार लाईव्हच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली जाईल.
टीप- संकल्प पाठविल्यानंतर फोन करणे आवश्यक - 8975495656
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment