नांदेड पोलीसातील महिला रेणुका देवणेने जिंकले दुसरे सुवर्ण पदक

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेडच्या महिला पोलिस खेळाडू रेणुका देवणे यांनी आज पुण्यात सुरु असलेल्या २८ व्या महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये थाळीफेक या क्रीडा प्रकारात दुसरे सुवर्ण पदक जिंकून आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. पुणे येथे २८ वि महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धा सुरु आहे. ३ जानेवारी ते ९ जानेवारी अश्या या क्रीडा स्पर्धा होणार आहेत.पहिल्याच दिवशी रेणुका देवणे यांनी गोळाफेक या क्रीडा प्रकारात १०.२४ फुट गोळा फेकून सुवर्ण पदक जिंकले होते, आज दिनांक ६ जानेवारी रोजी पुण्यात सुरु असलेल्या या क्रीडा स्पर्धेत थाळीफेक या क्रीडा प्रकारात रेणुका देवने यांनी २९.९५ फुट थाळी फेकली आणि सुवर्ण पदक जिंकले.दुसऱ्या स्थानावर २७.९८ फुट थाळीफेक फेकून रेश्मा सिरसाठ या पोलिस अकादमी येथील पोलिस उप निरीक्षकांनी रजत पदक जिंकले.तर कास्य पदक धनश्री धाडी या कोकण रेल्वे मध्ये काम करणाऱ्या महिला पोलिसांनी जिंकले.विजेत्यांना पदके देवून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. रेणुका देवणे यांनी मिळवलेल्या यशासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.रवींद्रकुमार सिंगल,विठ्ठल जाधव, राज्य राखीव पोलिस बल नानवीजचे प्राचार्य एम.बी.चेनीगुंड,नांदेडचे पोलिस अधीक्षक परमजीतसिंह दहिया,अपर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे,शाम घुगे,राखीव पोलिस निरीक्षक तरमान तडवी आणि अनेक सहकारी पोलिस कर्मचार्यांनी रेणुका देवणे यांचे अभिनंदन केले आहे.तसेच त्यांना भालाफेक आणि थाळीफेक स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी शुभकामना दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment