Tuesday, 5 January 2016

संघर्षातूनच यशाचे शिखर गाठता येते - राहुल लोहबंदे

" संघर्षातूनच यशाचे शिखर गाठता येते - राहुल लोहबंदे "
मुखेड :- रियाज शेख
तरुणांनी आता या देशातील शासनकर्ती जमात बनावी. राजकीय, सामाजिक, शैक्षणीक क्षेत्रातील मोक्याच्या जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रयत्न करीत असताना अपयश जरी आले तरी न डगमगता पुढे यश संपादन करण्यासाठी संघर्ष करावा. या संघर्षातुनच यशाचे शिखर गाठता येवु शकते आणि डाँ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत निर्माण होवु शकतो, असे मौलिक मार्गदर्शन माजी नगरसेवक व युवा नेतृत्व राहुल लोहबंदे यांनी केले. शहरातील डाँ.आंबेडकर स्मारकामध्ये आयोजीत भिमा-कोरेगाव शौर्य दिनानिमित्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गंगाधर सोंडारे, मोहन गायकवाड, गुंडेराव गायकवाड़, गौतम कांबळे, तुकाराम गायकवाड़, बालाजी बनसोडे, राहुल धामणगावकर, एकनाथ बनसोडे, आदी उपस्थित होते. यावेळी भिमा-कोरेगाव युध्दातील शहिदांना अभिवादन करण्यात आले.

No comments: