Tuesday, 5 January 2016

नमस्कार लाईव्ह ०५-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०५-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- पठाणकोटबद्दल दिलेला शब्द पाळा, अमेरिकेनं पाकला सुनावलं 

         पठाणकोट हल्ल्याबाबत आता अमेरिकेनं पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहे. हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर आम्ही कारवाई करू, असं पाकनं म्हटलंय, आणि ते आपला शब्द पाळतील, अशी आम्हाला आशा आहे, अशा शब्दात अमेरिकेनं नाराजी व्यक्त कर पाकला सुनावलंय.पठाणकोट हल्ल्यात सहा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं. हे सहाही दहशतवादी पाकिस्तानातून आले आहे. एवढंच नाहीतर चकमकी दरम्यान दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील आपल्या सूत्रधाराशी चार वेळा संपर्क साधला होता. याचा पुरावा भारताच्या हाती लागला.  भारताने हे पुरावे पाकला देणार आहे. भारताने दिलेले पुरावे आणि माहितीवर आम्ही काम करतोय, अशी भूमिका पाकने घेतली. पाकमधली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा या हल्ल्यात हात असल्याचा भारताला दाट संशय आहे. आता जैशवर पाक काय कारवाई करतं, ते पाहावं लागेल

२- धक्कादायक : पठाणकोट हल्ल्याची शरीफांना पूर्वकल्पना होती 

              पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे सेना प्रमुख राहील शरीफ यांना या दहशतवादी हल्याची कल्पना अगोदरपासून होती, असं आता समोर येतंय. मिळालेल्या माहितीनुसार, सीमेपलिकडून भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया रचणारे काही दहशतवादी भारतात घुसलेत, याची पूर्वकल्पना राहील शरीफ यांना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि भारतभेटीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दहशतवादाविरुद्ध पावले उचलण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, सेनाप्रमुखांकडून मात्र त्यांना हवा तसा प्रतिसाद नसल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे, भारत-पाक दरम्यान संबंध सुरळीत व्हावेत, अशी पाकिस्तान सेनेची इच्छा नसल्याचंच उघड होतंय. 

~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- पठाणकोट हल्ल्याबाबत मोदी-शरीफ यांच्यात चर्चा, कारवाईचं दिलं आश्वासन -पर्रिकर 

             पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा झाली असून शरीफ यांनी तपासात पूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलंय अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली.संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पठाणकोटला भेट दिली. त्यांच्याबरोबर लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग आणि हवाईदल प्रमुख चीफ मार्शल अरूप राहा संरक्षणमंत्र्यांसोबत होते. पाहणी केल्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी मीडियाला संबोधित केलं.पठाणकोटच्या कारवाईत 6 दहशतवादी ठार झाले असून 7 जवान शहीद झाल्याची माहिती दिली. तसंच शहिदांच्या कुटुंबीयांना 25 लाखाची मदत त्यांनी जाहीर केली. सर्व मृतदेहांची DNA चाचणी होणार आहे. पठाणकोटची कारवाई 28 तास सुरू राहिली आणि आता कोंम्बिंग ऑपरेशन सुरू असून ते उद्यापर्यंत चालणार असल्याचे त्यांनी म्हटलंय.

४- पंतप्रधान मोदींना 'शरिफ' यांचा फोन, 'हल्ल्यातील दोषींवर करणार कारवाई' 
         पंजाबमधील पठाणकोट हवाईतळावरील हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानमधील असल्याचे पुरावे सापडले आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे. मात्र, एवढा मोठा शस्त्रसाठा घेऊन दहशतवादी भारतात घुसले कसे, अशी चिंता मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केली आहे.पठाणकोट हवाईतळावरील हल्ल्यात आतापर्यंत एकूण 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे, तर दोन दहशतवाद्यांचे मृतदेह जळून खाक झाले आहेत. मात्र, पठाणकोटमध्ये अद्यापही कॉम्बिंग ऑपरेशन सुरु आहे, अशीही माहिती पर्रिकर यांनी दिली.पठाणकोट हवाईतळावर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानमधील असल्याचे पुरावे सापडले असून डीएनए तपासणीतून दहशतवाद्यांची ओळख पटेल, असे पर्रिकर म्हणाले. शिवाय, एनआयए दहशतवाद्यांचे डीएनए टेस्ट करणार आहे, अशी माहितीही पर्रिकरांनी यावेळी दिली. शिवाय, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरुन चर्चा केली असल्याचीही माहिती पर्रिकरांनी दिली.
           पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरिफ यांच्या भेटीनंतर त्यांच्या या भेटीवर अनेकांनी टीका केली. ही टीका थांबत नाही की तेवढ्यात पठानकोट येथे दहशदवादी हल्ला झाला आणि टीकेला अजून तीव्र झाली. पण नवाज शरिफ यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन केला.श्रीलंका येथून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून पठानकोट हल्ल्यावर मदत करण्याचा विश्वास दाखवला. भारताने ७२ तासांमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशदवादी संघटनेवर कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला आहे.

५- प्रणवचा विश्वविक्रम, 59 सिक्स, 129 चौकार, एकट्याच्या 1009* धावा 

               क्रिकेट जगतात मराठमोळ्या प्रणव धनावडेने विश्वविक्रम रचला आहे. आंतरशालेय क्रिकेटमध्ये कल्याणच्या प्रणवने एकट्याने नाबाद 1009 धावा ठोकल्या आहेत. एकाच सामन्यात 1 हजार धावा करणारा प्रणव जगातला पहिला फलंदाज ठरला आहे.के.सी. गांधी शाळेकडून खेळणाऱ्या प्रणवने आर्य गुरूकुलविरोधात 323 चेंडूत नाबाद 1009 धावा ठोकल्या. प्रणवच्या या सर्वोच्च धावांमुळे के.सी. गांधी शाळेला 1465 धावांचा डोंगर उभारता आला. के.सी. गांधी शाळेने आपला डाव 1465 धावांवर घोषीत केला आहे.के.सी. गांधी स्कूलने आर्य गुरुकुलचा अवघ्या 52 धावांत धुव्वा उडवून तब्बल 1413 धावांनी विजय मिळवला.मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं ठाणे जिल्ह्यात आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात के.सी. गांधी शाळेकडून खेळणाऱ्या प्रणवनं ही दिमाखदार कामगिरी केली.

६- पठाणकोट हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानीच : मनोहर पर्रिकर 

७- आणखी दोन दिवस सर्च ऑपरेशन सुरुच राहणार - संरक्षणमंत्री 

                 पठाणकोट येथील हवाई दलाच्या तऴावर गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा दहशतवाद्यांचा खात्मा जवानांनी केला असून आणखी दोन दिवस या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरुच राहणार आहे. मात्र या ठिकाणी कोणतेही दहशतवादी नसल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. दहशतवाद्यांशी दोन हात करताना आपल्या जवानांनी शोर्याचे काम केले असून कोम्बिंग ऑपरेशन २८ तास चालले. आणखी दोन दिवस सर्च ऑपरेशन सुरुच राहील. सध्या या ठिकाणी एकही दहशतवादी नसून दोन दहशतवाद्यांचे जळलेले मृत्यदेह सापडले आहेत. त्यांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. तसेच ज्या ठिकाणी दोन दहशतवादी लपले होते, तिथे नुकसान झाले आहे. हल्ला करणा-या दहशतवाद्यांकडे मोठाप्रमाणात शस्त्रसाठा होता. या हल्ल्यामागे पाकिस्तानचे कनेक्शन असल्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण दहशतवाद्यांकडे असलेला शस्त्रसाठा हा पाकिस्तानमधील असल्याचे मनोहर पर्रिकर यांनी यावेळी सांगितले.

८- शहीद लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला अटक 

          पठाणकोटच्या एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एनएसजीचे कमांडो लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या इसमाला अटक करण्यात आलीये.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक कऱण्यात आलीये. चांगले झाले. आणखी एक समस्या कमी झाली. आता त्यांच्या पत्नीला आर्थिक मदत आणि नोकरी मिळेल. सामान्य माणसाला काही मिळत नाही. लोकशाही वाईट आहे, असं त्यानं पोस्टवर म्हटलंय.मल्लपुरममध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय आरोपी अन्वरनेही केलेली पोस्ट वायरल झाली होती. यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला घरातून अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधानानुसार कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याक आलाय. दरम्यान, ही पोस्ट डिलीट करण्यात आली असून याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- एक कप चहाच्या बदल्यात ७ जवान शहीद - उद्धव ठाकरे 

            पंजाबच्या पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी व सरकारला जाब विचारत पठाणकोट हल्ल्याला तोडीस तोड उत्तर केव्हा देणार असा सवाल विचारला आहे. 'आजही बंदुका आणि तोफांच्या आवाजांनी देशाच्या कानठळ्या बसल्या आहेत आणि तरीही पठाणकोट हल्ल्याचा बदला आपण घेणार नसू तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरील शस्त्रांचे चलत् प्रदर्शन दाखविण्यात अर्थ नाही. हे शस्त्र प्रदर्शन अशा वेळी कुचकामी ठरते' अशा शब्दांत उद्धव यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.शरीफ यांच्यासोबत झालेल्या चहाच्या बदल्यात पठाणकोटला सात जवानांनी मरण पत्करले. त्या वीर जवानांची कुटुंबे आक्रोश करीत आहेत. पंतप्रधान त्या शहीदांच्या कुटुंबियांना काय उत्तर देणार असा थेट सवाल उद्धव यांनी विचारला आहे. फक्त सहा माथेफिरू दहशतवाद्यांची किंमत चुकवून पाकिस्तानने हिंदुस्थानची अब्रू घालवली आहे. देशाचे संरक्षणमंत्री, पंतप्रधान यांनी या प्रकरणातून धडा घ्यावा व सुधारणा कराव्यात, असा सल्लाही लेखातून देण्यात आला आहे.

१०- पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात एफआयआर दाखल 

११- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला संरक्षण देणार - पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे

१२- पठाणकोट हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येईल - संरक्षणमंत्री, मनोहर पर्रिकर. 

१३- नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात 

        मुलुंडमध्ये आपल्या नव्या कोऱ्या 'ह्युन्डाई आय टेन' या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. त्यामुळे ही गाडी बिल्डिंगच्या आवाराच्या बाहेर जाऊन थेट रस्त्यावर जाऊन एका दुसऱ्या गाडीला धडकली. उल्लेखनीय म्हणजे, ही गाडी एका आमदाराची होती.आमदार अशोक पाटील यांच्या गाडीवर ही गाडी आदळली... त्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या कठडयांवर जाऊन ही गाडी धडकली. या अपघातात आमदार बचावले असले तरी त्यांचे सहकारी मात्र जखमी झालेत. हा अपघात इतका तीव्र होता की दोन्ही गाड्यांचं प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान पोलिसांनी विभास झा यांच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, काल दुपारीच विभासनं आपल्या नवी गाडी आपल्या घरी आणली होती.

१४- 'या' अतिरेक्यांना घरात घुसून मारा - अक्षय कुमार 

         पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची भावना असताना अभिनेता अक्षयकुमारनेही आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. दहशतवादाच्या समस्येवर माझ्याकडे अंतिम तोडगा नाही पण ज्या प्रमाणे या अतिरेक्यांनी आपल्या देशात घुसून आपल्या जवानांना मारले तशीच कारवाई या अतिरेक्यांवर करा, यांना यांच्या घरात घुसून मारा असे अक्षयने म्हटले आहे. अतिरेक्यांबद्दल अक्षयने संताप व्यक्त केला असला तरी, त्याने या हल्ल्याला पाकिस्तानशी जोडू नये असे म्हटले आहे. अतिरेक्यांना शांतता चर्चेमध्ये मोडता घालायचा असल्याचे त्याने सांगितले. पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या प्रयत्नांना अक्षयने पाठिंबा दिला. 

~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- नाशिकच्या KTHM कॉलेजमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन 

          नाशिकच्या कॉलेज तरुण-तरुणींमध्ये सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे कॉलेजमध्ये बसवण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिनची.कॉलेजमध्ये आठ सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन बसवून केटीएचएम कॉलेजने क्रांतिकारी पाऊल उचललं आहे. मासिक पाळीच्या दिवसांत विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होते. त्यांना अनेक संधींवर पाणी सोडावं लागतं. मात्र यापुढे कॉलेजमध्येच सॅनिटरी पॅड मिळणार असल्यामुळे विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्नित सर्व कॉलेजमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

१६- पुणे; कोमल वर्देला जातपंचायतीचा फटका, काशीकापडीच्या 9 पंचांना बेड्या 

             अनिष्ट रुढीविरोधात आवाज उठवणाऱ्या कोमल वर्दे यांना काशीकापडी समाजातील जातपंचायतीचा फटका बसला. जातपंचायतीचे नियमांविरोधात आवाज उठवणाऱ्या कोमल वर्देंच्या कुटुंबाला जात पंचायतीने वाळीत टाकलं. मात्र कोमल वर्देंच्या तक्रारीनंतर नऊ पंचांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील काशीकापडी समाजाच्या स्त्रियांना पतीच्या निधनानंतर त्याच्या मृतदेहासोबत आंघोळ घालण्याची आणि कोंडून ठेवण्याची प्रथा आहे.काशीकापडी समाजाच्या जात पंचायतीने काही नियम घालून दिले आहेत. मात्र या विरोधात पीडित शोभा वाटमकर यांची मुलगी कोमल वर्दे यांनी आवाज उठवला आणि नऊ जात पंचांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

१७- विश्वविक्रमवीर प्रणवचा खर्च राज्य सरकार उचलणार 

          कल्याणच्या प्रणव धनावडे या विश्वविक्रमवीर क्रिकेटपटूचा शिक्षण आणि क्रिकेटच्या कोचिंगचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.प्रणवनं क्रिकेटच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी यासाठी क्रीडाखात्याकडून प्रणवला मदत मिळणार आहे. क्रिकेटच्या इतिहासातल्या य़ा सर्वोच्च खेळीनंतर प्रणव धनावडेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

१८- नाशिकमध्ये महापालिकेच्या शाळेत घुसून विद्यार्थीनींना गावगुंडांनी मारहाण 

१९- उत्तरप्रदेशात ८ जानेवारीला 'नो अॅक्सिडेंन्ट डे' 

२०- आज दुपारी  चेन्नईतील शाळेत बॉम्बची अफवा, विद्यार्थ्यांना घरी पाठवले.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- शरद पवार ते रितेश देशमुख, प्रणव धनावडेवर शुभेच्छांचा वर्षाव !
२२- प्रणव यशाचं शिखर गाठ, क्रिकेटच्या देवाकडून कौतुक  

           आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत धडाकेबाज नाबाद 1009 धावा ठोकणाऱ्या कल्याणच्या प्रणव धनावडेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रणवच्या या विश्वविक्रमी खेळीबद्दल साक्षात क्रिकेटच्या देवाने त्याला शाबासकी दिली आहे.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका इनिंगमध्ये एकट्याने 1000 धावा केल्याबद्दल प्रणवचं अभिनंदन केलं. तसंच कठोर मेहनत घेऊन यशाचं शिखर गाठ, अशा शुभेच्छा दिल्या.

२३- बाजीराव-मस्तानी जगभरात ३०१ कोटी 
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२४- मुखेड तालुक्यात कडाक्याची थंडी
http://goo.gl/KAqH8l
~~~~~~~~~~~~~~~
२५- संघर्षातूनच यशाचे शिखर गाठता येते - राहुल लोहबंदे
http://goo.gl/Sxyhv2
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
सौंदर्य हे वस्तुत नसते तर पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते
(प्राजक्ता मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
आपल्या नवीन वर्षीच्या संकल्पांना आम्ही नमस्कार लाईव्हमधून प्रसिद्धी देवू.
पाठवा आपले संकल्प आम्हाला -
 8975495656 या नंबर वर
आमच्या वाचकाचा संकल्प
१- "मी दररोज रोजनिशी लिहील"- रुपेश दरक, वसमत,
2- मी शारिरिक दूष्टया तंदुरूस्त राहन्यासाठी नियमित सुर्यनमस्कार व प्राणायाम करीन - गणेश कवडेवार, लातूर 9404464862
३- वाहन चालवितांना वेगावर नियंत्रण ठेवील- प्रवीण लढ्ढा, 9423441930
४- गरीब व होतकरू मुलांना मदत करीन के.स्वामी, किनवट - 988111149
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल. सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड. मो. - 7768824322, 8483899333 <संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट * * * * * फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल.... ....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी..... संपर्क- 9423785456, 7350625656
*****************

आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५ आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस...... आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क बाहेती- 9423785456, गायकवाड- 8975495656 १४७५ ग्रुप पाहण्यासाठी लिंक

No comments: