Sunday, 3 January 2016

नांदेड मनपाची आजची अर्थ व्यवस्था म्हणजे बुडत्याचा पाय खोलात



भारतीय शेतकऱ्याचे वर्णन करतांना असे म्हटले जात होते की तो कर्जात जन्मतो कर्जात वाढतो आणि कर्जातच मारतो तशीच अवस्था नांदेडच्या महानगर पालिकेची झालेली आहे. घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज फेडण्यासाठी नवीन कर्ज कुठलाही केंद्र व राज्यातील योजनेतील आपल्या वाट्याची रक्कम भरण्यासाठी कर्ज असे फक्त करणे बदलतात पण कर्ज घेणे काही थांबत नाही. ह्या परिस्थितीची कबुली कुठल्याही विरोधी नेत्याने दिलेली नसून दस्तूर खुद: आयुक सुशील खोडवेकर यांनीच दिलेली आहे. काल दि. २ जानेवारी रोजी २०१६ सालासाठी तयार करण्यात आलेल्या दैनंदिनीचे विमोचन झाल्यानंतर ते पत्रकारासोबत बोलत होते. या वेळी त्यांनी बरीच आकडेमोडही सदर केली व उत्पन्न वाढविण्याची गरज व्यक्त केली ज्यावेळी आयुक्तांनी हि गरज व्यक्त केली तो कार्यक्रम मनपाच्या दैनंदिनीच्या विमोचानाचा होता. परंतु ती जी दैनंदिनी ब`बनविली त्यावरूनच आता नाट्य रंगत आहे. व महापौरांनी त्या डायरीचे वितरण थांबविण्याच्या सूचना केल्या आहे. असे घडले तर त्या खर्च वाया जाणार याची जबाबदारी कुणाची? एकीकडे उत्पन्न वाढीबद्दल चर्चा करायची व दुसरीकडे अशी उधळपट्टी करायची हे काय दर्शविते? अशी खमंग चर्चा संपूर्ण नांदेड शहरात मनपाच्या कर्मचार्यात, पदाधीकार्यात चालू आहे.

     परन्तु आश्चर्याची गोष्ट म्हणजे उधळपट्टीचा कारभार थांबवावा. ज्या कामासाठी कर्मचाऱ्यांना पगार दिला जाते ते कलाम व्यवस्थित हेते कि नाही या विषयी त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. नांदेड महानगर पालिकेचा अतिक्रमण विभाग हा फक्त स्वताचे खिसे भरण्यासाठी फिरतो का?  या विभागाला दिल्या जाणाऱ्या पगारानंतरही जर नांदेड मध्ये सरस अतिक्रमण होते तर ह्या विभागावर खर्च का करावा सर्वत्र रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण ह्या लोकांना दिसत नाही. कुठलेही अतिक्रमण दोन तासांपेक्षा जास्त काळ हटविले जात नाही अनेक इमारतीचे मजलेही रात्रीत उभे राहतात. मग त्यावरचा खर्चही का करावा?  अशीच व्यवस्था स्वच्छता विभागाची कितीह्यी खर्च केले तरी शहरात स्वच्छता दिसताच नाही सर्वत्र बकालपणा असतो.
    एकीकडे आंदोलन करण्यासाठी सुद्धा परवानगीची गरज व्यक्त झाली पण अतिक्रमणासाठी असी कडक कारवाई नाही त्या महानगर पालिकेचे उत्पन्न तरी कसे वाढणार, असे नागर्काकडून बोलले जात आहे

No comments: