नमस्कार लाईव्ह ०२-०१-२०१६ सकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
१- पठाणकोट हवाईतळावर दहशवादी हल्ला, चारही दहशवादी ठार
नववर्षाच्या पहिल्याच रात्री दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. पंजाबमधील पठाणकोट हवाईतळावर दहशतवादी घुसले. चार दहशतवाद्यांनी पहाटे तीनच्या सुमारास तुफान गोळीबार केला. सुरक्षा रक्षकांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चारपैकी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं . मात्र दोन दहशतवाद्यांसोबतची चकमक सुरुच होती. अखेर सुमारे पाच तासांच्या चकमकीनंतर उर्वरीत दोन दहशतवाद्यांनाही यमसदनी धाडण्यात जवानांना यश आलं आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात दोन जवानांनाही वीरमरण आलं आहे. तर घटनास्थळी सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली असून, लष्कर, एअरफोर्स आणि एनएसजी जवानांनी मोर्चा सांभाळला आहे. पहाटे सुरु झालेली ही धुमश्चक्री सकाळी साडेआठपर्यंत सुरू होती. दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.या धुमश्चक्रीच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पठाणकोट हवाईतळ हे पाकिस्तान बॉर्डरपासून अवघ्या 50 किमी अंतरावर आहे. पठाणकोटजवळच्या अकालगढ हवाईतळावर काही शस्त्रधारी दहशवादी घुसले आणि त्यांनी फायरिंग सुरू केली, अशी माहिती पंजाब बॉर्डर रेंज पोलीस उपमहानिरीक्षक विजय कुंवर प्रताप सिंह यांनी दिली. दहशवाद्यांनी पहाटेच्या सुमारास हल्ला केला. त्यामुळे अतिरिक्त सुरक्षा दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. सुरक्षा रक्षकांनी या परिसराला चहूबाजूंनी घेरलं आहे. तसंच जम्मू- पठाणकोट महामार्गावर नजर ठेवण्यात येत आहे. दरम्यान,या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच हे अतिरेकी पाकिस्तानमधून आल्याची माहितीही मिळत आहे.
२- 'पाकिस्तानशी चर्चा जरूर करा, पण आमची माणसं मरायची कधी थांबणार' - निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर
पाकिस्तानशी चर्चा जरूर करा, पण आमची माणसं, आमचे जवान मरायचे कधी थांबणार, असा उद्विग्न सवाल, निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी केला आहे. “पठाणकोटसारखे हल्ले किती सहन करायचे, किती माणसं गमवायची?.महिन्यापूर्वीच संतोष महाडिकांचं बलिदान गेलं. शत्रूंनी आपल्या भूमीत, आपल्याच लोकांचा प्राण घेणं हे कितपत सहन करायचं? या सहनशीलतेला मर्यादा हवी. त्यामुळे सरकारने कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे”, असं दत्तात्रय शेकटकर म्हणाले.
३- सेन्सॉर बोर्डाचा चेहरा-मोहरा सुधारणार, श्याम बेनेगलांच्या नेतृत्वात समिती
सेन्सॉर बोर्डाचा चेहरा-मोहरा बदलण्यालाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या नेतृत्वाखाली सेन्सॉर बोर्डाच्या फेररचनेसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला दोन महिन्यात आपला अहवाल सादर करावयाचा या समितीत दिग्ददर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, पीयूष पांडे और फिल्म समीक्षक भावना सौमैया यांचा समावेश करण्यात आला आहे. चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्याचा प्रकार असो, वा अर्वाच्य भाषेवर बंदी, सेन्सॉर बार्डाचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. जेम्स बाँडच्या ‘स्पेक्टर’मधील किसिंग सीनला भारताच्या सेन्सॉर बोर्डानं कात्री लावल्यानं सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. या वादग्रस्त निर्णयावरुन सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यावर सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे.
४- रॉकेलची सबसिडीही थेट बँक खात्यात, पेट्रोलियम मंत्रालयाची घोषणा
एलपीजीच्या धर्तीवर पेट्रोलियम मंत्रालयाने रॉकेलबाबतही सबसिडी योजनेची घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2016 पासून रॉकेलची सबसिडी थेट बँक खात्यात जमा होणार आहे. सुरुवातीला केवळ 8 राज्यांमधील 26 जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. पहिल्या महिन्याच्या सबसिडीची रक्कम ग्राहकांना एक महिना आधीच दिली जाणार आहे. ज्या राज्यांमधून या योजनेची सुरुवात होणार आहे, त्यामध्ये राजस्थान, पंजाब, छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. पीडीएस म्हणजेच सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे रॉकेलची सबसिडी देण्याची सरकारची पद्धत आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली ही राज्याची असते. आता ग्राहकांच्या बँक खात्यात थेट सबसिडीची रक्कम जमा होणार असली, तरी राज्य सरकारलाही विशिष्ट रोख रक्कम इन्सेन्टिव्ह स्वरुपात केंद्राकडून दिलं जाणार आहे.
५- राहुल गांधी होणार काँग्रेसचे अध्यक्ष ?
लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसमधून राहुल गांधी अध्यक्ष व्हावे अशी मागणी केली जात होते. अखेर आता लवकरच राहुल गांधी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेण्याची शक्यता आहे. राहुल गांधी लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष होणार अशी बातमी पीटीआयने दिलीये. काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका संपल्यानंतर राहुल गांधींच्या अध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. राहुल सध्या नववर्षाच्या सुट्टी निमित्त युरोपाच्या दौर्यावर आहे. युरोपातून परतल्यानंतर अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग येईल. गेल्या काही वर्षांपासून राहुलना अध्यक्ष करा अशी मागणी काँग्रेसजन करत होते. अलीकडे बिहार निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं.
६- आम्ही शांततेचे पुरस्कर्ते आहोत, पण आमच्यावर हल्ला झाला तर त्याचे सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल - गृहमंत्री राजनाथ सिंह
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- ड्रायव्हिंग दरम्यान मोबाईलवर बोलल्यास परवाना रद्द - परिवहन मंत्री दिवाकर रावते
‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अर्थात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांना दणका देण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. कारण दारु पिऊन गाडी चालवल्यास, अथवा वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास थेट तीन महिने ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबतची घोषणा नव्या वर्षात राज्यातील वाहतुकीचे नियम आणखी कडक करण्याचा निर्णय रावतेंनी घेतला आहे. त्यानुसार नव्या नियमांबाबतची माहिती रावतेंनी दिली.
या कारणांसाठी परवाना रद्द होऊ शकतो !
– दारु पिऊन गाडी चालवल्यास
– वाहन चालवतांना मोबाईल फोनचा वापर केल्यास.
– अधिक वेगाने वाहन चालवल्यास.
– सिग्नल तोडल्यास.
– मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक केल्यास.
– मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक केल्यास.
८- ‘पोलीस डायरी’ आजपासून हद्दपार, हायटेक यंत्रणेची सांगलीपासून सुरुवात
पोलीस स्टेशनमध्ये पाय ठेवताच सर्वात पहिले दर्शन होतं ते स्टेशन डायरीमध्ये खरडपट्टी करणारा अधिकाऱ्याचं. मात्र सांगलीतल्या पोलीस ठाण्यामध्ये आजपासून तुम्हाला वेगळं चित्र दिसेल. कारण 1 जानेवारीपासून सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद स्टेशन डायरीमध्ये नव्हे तर सीसीटीएन या प्रणालीवर करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यातले व्यवहार पेपरलेस करण्याच्या दृष्टीनं सांगली पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. यामुळे पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारींना आळा बसणार आहे. तसेच एकदा सीसीटीएन प्रणालीवर तक्रार दाखल झाली की, ती तक्रार किंवा एफआयआर राज्याचे पोलीस महासंचालक, सीआयडी आणि संबंधित न्यायालयांना मिळू शकते. त्यामुळं तक्रारदाराचा वेळ देखील वाचणार आहे.
९- भुजबळांना क्लीन चीट देणार्या अभियंत्यांची चौकशी
दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना क्लीन चीट देणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनिअर्स एस.डी. देबडवाड आणि टी.एस.चव्हाण यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसंच त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. देबडवाड आणि टी एस चव्हाण यांनी इंजिनिअर्सनी अँटी करप्शन ब्युरोला पाठवलेल्या अहवालात भुजबळ यांना क्लीन चीट दिली होती. राज्य सरकारनं हा अहवाल फेटाळून लावला आहे. या अहवालात या दोन्ही इंजिनिअर्सनी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कोणतीही अनियमीतता नसल्याचं म्हटलं होतं. या अहवालाची अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना कल्पना नव्हती. या सगळ्या प्रकारामुळे सरकार करत असलेल्या चौकशीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ कुटुंबियांना कोणतीही क्लीन चीट दिली नसल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.
१०- काळा पैसा परत येणार होता त्याचं काय झालं?, अण्णांचं मोदींना पत्र
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय, भ्रष्टाचार, लोकपाल आणि लोकआयुक्ताबाबात या पत्रात प्रश्न विचारण्यात आले आहे. तसंच मोदींनी सत्तेत येण्याआधी काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांचं काय झालं असा सवालही अण्णांनी उपस्थित केला.
अण्णांचं मोदींना पत्र
“मोदी जी, माझ्या पत्राला उत्तर देऊ नका. मात्र चर्चेचं मन मोठं ठेवा. पी. व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या विरोधातही मी आंदोलनं केली होती. पण तरीही त्यांनी चर्चेची तयारी दाखवली. वो बडे मन के लोग थे ! काळा पैसा परत येणार होता त्याचं काय झालं? तुम्ही यापूर्वी माझी सर्व पत्रं केराच्या टोपलीत टाकली आहेत. हेही तुम्ही केराच्या टोपलीतच टाकणार. पण देशहितासाठी माझी लढाई सुरूच राहील. शेतकर्यांच्या कृषिमालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्या करतोय. खरं बोललो तर सख्ख्या आईलाही राग येतो. तसंच माझ्या बोलण्यानं तुम्हाला राग येत असेल. पण माझं काम मी सुरू ठेवणार आहे.” – अण्णा हजारे
११- जळगाव : पंतप्रधानांना 'ऑर्डर' देणाऱ्या भिडे गुरुजींनी मुख्यमंत्र्यांचं विमानही थांबवलं!
पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'ऑर्डर' देणाऱ्या भिडे गुरुजींनी आता मुख्यमंत्र्यांचं विमानालाही काही काळ थांबवण्यासाठी भाग पाडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुक्ताईनगरच्या एका कार्यक्रमासाठी जळगावात दाख ल झाले होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही त्यांच्यासोबत होते. कार्यक्रम संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी मुख्यमंत्री आपल्या विमानाच्या दिशेने रवाना झाले. ते विमानात जाऊन बसलेही... पण तरीही उ्डाडाणासाठी विमानाला काही काळ थांबावं लागलं, कारण भिडे गुरुजी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी तिथं उपस्थित झाले होते.
१२- पाकिस्तानला त्यांच्याचं भाषेत उत्तर दिलं पाहिजे- संजय राऊत, शिवसेना खासदार
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- कोल्हापुरात 12 वीच्या विद्यार्थ्याची हत्या
कोल्हापुरात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. राजवर्धन संभाजी गवळी असं मृत युवकाचं नाव असून, तो विवेकानंद महाविद्यालयात शिकत होता. 18 वर्षीय राजवर्धनची हत्या महाविद्यालयीन वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उचगाव पुलाजवळ शुक्रवारी रात्री हत्येचा हा थरार झाला. राजवर्धनला धारदार शस्त्राने भोसकण्यात आलं. रात्री 11 च्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शास्त्राने राजवर्धनच्या पोटात , मांडीवर असे 10 ते 15 वार केले. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजवर्धनला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४- पतीच्या प्रेतासोबत महिलेला अंघोळ; पतीच्या निधनानंतर प्रथेच्या नावावर झाले पत्नीवर अत्याचार
अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांसमोर पतीच्या प्रेतासोबत डोक्यावर तूप लावून विधवेला अंघोळ, दहाव्या दिवशी तिचा साज उतरवणे, तिचा अशुभ चेहरा दिसू नये म्हणून अंधार्या खोलीत कोंडणे आदी अघोरी प्रकार म्हणजे वेगळ्या प्रकारची सतिप्रथाच. तेव्हा ती बंद करा, अशी विनंती केली जाते. जातीचे पंच ती धुडकावून लावतात. परिणामी, लेकीला वडिलांचे अंतिम दर्शन न करताच परत फिरावे लागले. पुण्यात गेल्या 24 डिसेंबरला हा प्रकार घडला. आता त्या लेकीने काशीकापडी समाजातील अशा प्रकारे होणार्या विधवांची अवहेलना विटंबनेविरुद्ध एल्गार पुकारला आहे. कोमल वर्दे हिचे वडील शंकर मोतीराम वाटमकर (65) यांचं गेल्या गुरुवारी पुण्यात निधन झालं. पतीच्या निधनानंतर त्या महिलेला तूप लावून प्रेतासोबत आंघोळ घातली जाते. इतकंच नाही तर तिला दहाव्या दिवशी तिला संपूर्ण अंधार्या खोलीत दिवसभर डांबून ठेवलं जातं. तिचं कोणीही तोंड पहायचं नाही अशा अनेक अघोरी गोष्टी केल्या जातात. याचविरोधात कोमलनं आवाज उठवला. हे थांबवण्यासाठी तिने पुढाकार घेतला. समाजातल्या लोकांना तिने तसं सुचवलं. तथापि, पंचांनी ती विनंती फेटाळली. प्रथा बदलायच्या असतील तर महापंचायत बसवा, असं सांगितलं. विविध राज्यांमधील पंचांची मिळून बसणारी ही महापंचायत म्हणजे काही लाखांचा खर्च असल्याने ते शक्य नसल्याचे कोमल यांनी स्पष्ट केलं. परिणामी, पुण्यातले पंच सुनील गादेकर, शंकर वाडेकर, शरद भिंगारे, नारायण आंदेकर, दीपक वाडेकर, दीपक वर्देकर, चंद्रकांत पालकर, भोलानाथ वाटमकर आणि महेंद्र वाटमकर या नऊ पंचांनी तिच्या आईला मुलगी हवी की पंच हवेत असा सवाल केला. याचाच दबाव येऊन आईनं पंच हवे म्हणून सांगितलं आणि कोमलला वडिलांचं अंत्यदर्शन न घेता परतावं लागलं. कोमलनं मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तसंच फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
१५- दिल्लीतील मेट्रो स्थानकांमध्ये वायफाय
दिल्ली मेट्रोने शुक्रवारपासून राजीव चौक आणि कश्मीरी गेट या दोन स्थानकांवर वाय-फाय सेवा सुरु केलीये. या सेवेंतर्गत पहिल्या ३० मिनिटांसाठी मोफत वायफाय देण्यात येणार आहे. त्यानंतर वायफाय वापरल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागतील. दिल्ली मेट्रोने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. मेट्रो स्थानकांवर वायफाय सेवा देण्याबाबत २०१५ मध्ये डीएमआरसी आणि रेल्वे टेलि कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यात संमतीपत्रावर स्वाक्षऱ्याही झाल्या होत्या.डीएमआरसीनुसार वायफाय सेवेसाठी दिल्लीतील सध्या पाच स्थानकांची निवड करण्यात आलीये. लवकरच दिल्ली विद्यापाठी, केंद्रीय सचिवालय येथेही वायफाय सेवा सुरु केली जाईल.
१६- हावडा-अमृतसर एक्स्प्रेस सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी जवान पंकज कुमार आणि बालक कुमार यादव या दोघांना गुवाहाटी विमानतळावरून अटक
१७- उत्तर प्रदेशमधील बलरामपूर येथे जीप व बसची धडक होऊन झालेल्या अपघातात १० जण झाले ठार
१८- नवी दिल्ली: सम-विषम फॉर्म्युला अमलात आल्याने पहिल्याच दिवशी दिल्लीतील शहरातील प्रदूषण कमी झाल्याचे वृत्त.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१९- आकारा लाख टन चाऱ्याचा तुटवडा; जिल्ह्यात पशुपालाकांची चिंता
२०- भीमा कोरेगाव शौर्य दिनामिमित्त शहरात भिसैनिकांची रॅली
२१- महापालिकेच्या शिक्षक व महिला बालकल्याण समितीची आज बैठक
२२- बारड; चित्रपट पाहून केली प्राध्यापकाची हत्या; दोन संशयितांना पाच डीसें.पर्यंत पोलीस कोठडी
२३- बारड; पार्टीसाठी गेलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू; शेम्बोलीतील विहिरीत सापडला मृतदेह
२४- हैदराबादच्या तीन तरुणांकडून ६० जिवंत काडतूस जप्त; किनवटजवळील खरबी जंगलात दराटी पोलिसांची कारवाई
२५- अर्धापूर; आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिघांना १० वर्ष सक्तमजुरी
~~~~~~~~~~~~~~~
२६- परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात वाघलगाव येथे, शेतकऱ्याच्या तरुण मुलीची आत्महत्या
http://goo.gl/L0bc3T
~~~~~~~~~~~~~~~
२७- मेगा ब्लॉक मुळे दिनांक १९.१.२०१६ पर्यंत मनमाड-काचीगुडा गाडी निझामाबाद पासूनच धावणार
http://goo.gl/GCGrWz
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे पाप होईल इतके कमावू नये, आजारी पडू इतके खावू नये आणि भांडण होईल इतले बोलू नये
[वृषाली कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
दामोदर वडजे, विठल देशमुख, लक्ष्मण रेड्डी, चैतन्या गुंजाळ, प्रवीण गायकवाड, कंटक सूर्यतळ, योगेश देशमुख, मदनलाल पाटीदार, अब्दुल मुतालीब, जंधर ठाकूर, रमेश तालीमकर, किशन श्रीरंगकर, हबीब खान, हाजीर रहमान, जगन्नाथ गुंटूरकर, महेश राऊत, अनिकेत परब, शिवाजी कोटकर, सतीश लाठकर, बालाजी हंडे, साहेबराव राठोड, तुकाराम पावडे, संदीप पांचाळ, साईनाथ कोटगिरे, शशिकांत बंदेवर, विनय कुमार राय,
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
Choco-N-Nuts
चॉकलेट व ड्राय फ्रुट्स
सर्व प्रकारचे Dry Fruits उपलब्ध.
विविध प्रकारच्या आकारात चॉकलेट
जैन मंदिर जवळ, मारवाडी धर्मशाळेच्या समोर,
वजिराबाद, नांदेड
देशमुख- 9881788080
अग्रवाल- 8408822202
२ जानेवारीपासून भव्य शुभारंभ
अधिक माहितीसाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/MC3JcO
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नमस्कार लाईव्हमध्ये डिसेंबर महिन्यात २७५ नवीन ग्रुप अड्ड झालेत
सर्व नवीन ग्रुपचे हार्दिक स्वागत.
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५ ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

1 comment:
8105212105 LA whatsapp group madhe add kara sir...
thanx.....
Post a Comment