Friday, 1 January 2016

सदृढ आरोग्‍यासाठी किशोरवयीन मुलींच्‍या आरोग्‍याची काळजी घेणे काळाची गरज - सौ. वर्षाताई भोसीकर




           नांदेड, 1- सदृढ आरोग्‍यासाठी किशोरवयीन मुलींच्‍या आरोग्‍याची काळजी घेणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी केले. कंधार तालुक्‍यातील पानशेवडी प्राथमिक आरोग्‍य केंद्रांतर्गत फुलवळ येथे घेण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या. सुमनताई पांडागळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यक्रमात डॉ.सुमीत शेट्टे, डॉ.शाहीन शेख, डॉ.आईनलोड, पत्रकार धोंडीबा बोरगावे, ज्ञानेश्‍वर तेलंग, मुख्‍याध्‍यापक खंडेराव पांडागळे, अंगणवाडी पर्यवेक्षीका घोडजकर, शेख अली आदींची उपस्थिती होती.
      पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींच्‍या आरोग्‍यासाठी राष्‍ट्रीय किशोर स्‍वास्‍थ कार्यक्रम राबविला जातो. या अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी आरोग्‍य शिबिर घेऊन तपासणी करणे, औषधोपचारासह, आरोग्‍यविषयक मार्गदर्शन करण्‍यात येते. याचा फायदा पालकांनी घेणे आवश्‍यक आहे. ही पिढी सदृढ झाली तरच सक्षम देश होण्‍यास वेळ लागणार नाही, असेही त्‍या म्‍हणाल्‍या. यावेळी अंगद मुंडे, मुश्‍ताक अली, मिना वाघमारे, यांच्‍यासह गावकरी, किशोरवयीन मुली, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.

No comments: