Friday, 1 January 2016

हागणदारीमुक्‍तीसाठी प्रस्‍तावित ग्रामपंचायतींची येत्‍या 4 जानेवारी पासून होणार तपासणी



       नांदेड, 1- राज्‍य शासनाला हागणदारीमुक्‍तीसाठी प्रस्‍ताव पाठविलेल्‍या ग्राम पंचायतींची तपासणी सोमवार दिनांक 4 जानेवारी 2016 पासून करण्‍यात येणार आहे. औरंगाबाद व परभणी जिल्‍हयातील पथकाव्‍दारे ही तपासणी करण्‍यात येईल, अशी माहिती उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड यांनी दिली आहे.
      स्‍वच्‍छ भारत अभियानांतर्गत नांदेड जिल्‍हयातील हागणदारीमुक्‍तीसाठी तयार असलेल्‍या गावांची तपासणी करण्‍यात येणार आहे. या तपासणीमध्‍ये गावातील किती कुटूंबांकडे शौचालय आहे, शौचालयाचा वापर होतो किंवा नाही. शाळा व अंगणवाडीतील स्‍वच्‍छता संकुल, गावातील सांडपाणी व घणकचरा व्‍यवस्‍थापन, वैयक्तिक स्‍वच्‍छता आदींची पाहणी या पथकामार्फत करण्‍यात येणार आहे.
     नांदेड जिल्‍हयातील 57 ग्राम पंचायतींचा यात समावेश असून अर्धापूर तालुक्‍यातील खैरगाव, डौर, पार्डी म., देळूब खू., शेलगाव खु., बामणी, पिंपळगाव महादेव, दाभड, शहापूर, सांगवी खु. व धामदरी, लोहा- पळशी, कामळज, पोलिसवाडी, बोरगाव को., वडेपुरी, मुरंबी, डेरला व नगारवाडी, नायगाव- शेळगाव गौरी, मनूर त.ब., परडवाडी व चारवाडी, मुखेड- कोटग्‍याळवाडी, गोणेगाव, हिप्‍परगामाळ, राजुरा तांडा व पांडूर्णी, मुदखेड- हिस्‍सापाथरड, धनज, वाडीमुक्‍ताजी व वरदडा तांडा, उमरी- नागठाना, रामखडक व जिरोणा, हदगाव- उमरी खु. व फळी, बिलोली- खतगाव, खपराळा व रामपूरथडी, किनवट- आमडी, बुधवारपेठ व कनकवाडी तर भोकर तालुक्‍यातील खरबी व डोरली या ग्राम पंचायतींची तपासणी करण्‍यात येणार आहे.
चौकट
 तपासणी चार स्‍तरावर होणार
हागणदारीमुक्‍तीसाठी तयारीसाठी असलेल्‍या गावांची तालुकास्‍तरावरुन तपासणी करुन प्रस्‍ताव जिल्‍हास्‍तरावर पाठविण्‍यात आलेले आहेत. केआरसी मार्फत आता ही तपासणी करण्‍यात येत आहे. त्‍यानंतर राज्‍य व केंद्र शासनाच्‍या प्रतिनिधींकडूनही या गावांची तपासणी झाल्‍यानंतर यात ही गावे पात्र ठरली तरच ही गावे हागणदारीमुक्‍त झाल्‍याचे घोषित केले जाणार आहेत.  

No comments: